शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

या वर्षी डाळींना तडका महागाईचा

By admin | Updated: December 28, 2015 07:51 IST

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या वर्षपूर्तीनंतर २०१५मध्ये जून महिन्यापासून डाळींचे भाव भडकायला लागले. पहिल्या वर्षात महागाईवर बऱ्यापैकी नियंत्रण ठेवण्यात केंद्र सरकारला यश आले होते.

योगेश बिडवई,  मुंबईकेंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या वर्षपूर्तीनंतर २०१५मध्ये जून महिन्यापासून डाळींचे भाव भडकायला लागले. पहिल्या वर्षात महागाईवर बऱ्यापैकी नियंत्रण ठेवण्यात केंद्र सरकारला यश आले होते. मात्र, जून महिन्यापासून डाळींच्या भावात विक्रमी वाढ झाली. एक प्रकारे डाळींचा त्यातही तूरडाळीचा भडका उडाला. डिसेंबर २०१४मध्ये ६० ते ६५ रुपये किलो असलेली तूरडाळ २३० रुपयांवर गेली. उडीद, मूग, हरभरा डाळीनेही शंभरी पार केली. डाळीचे दर आटोक्यात येण्यासाठी सरकारने आटोकाट प्रयत्न केले असले, तरी अद्यापही डाळींच्या किमती नियंत्रणात आणण्यात सरकारला यश आलेले नाही. त्यातच, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार, डाळीची वाढती मागणी आणि घटते उत्पादन, यामुळे २०१६ मध्येदेखील डाळीचे भाव कमी होण्याची चिन्हे नाहीत. सप्टेंबरनंतर कांद्यानेही चाळीशी पार केल्याने महागाईत भर पडली. कांदा व्यापाऱ्यांनी नफेखोरी करून, तब्बल ८ हजार कोटींची लूट केल्याचा अंदाज नीती आयोगाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात व्यक्त करण्यात आला. कांद्याचे भाव काहीसे नियंत्रणात येताच, डाळी भडकल्या. २०१४मध्ये देशात डाळींचे उत्पादन कमी झाले होते. मात्र, आयातीच्या माध्यमातून केंद्राने डाळींचे दर नियंत्रणात ठेवले होते. नोव्हेंबर २०१४मध्ये महागाई दर शून्य टक्क्यांवर म्हणजेच, गेल्या सहा वर्षांच्या नीचांकावर येऊन ठेपला होता, यावर आता कोणाचा विश्वास बसणार नाही. कडधान्याची मागणी व पुरवठा याचे भारतातील गणित कायम व्यस्त राहिले आहे. एकीकडे देशात हरित क्रांती झाली, त्यात केवळ गव्हाचे उत्पादन वाढले. मात्र, कृषी धोरणात कडधान्याच्या उत्पादन वाढीकडे विशेष लक्ष देण्यात आले नाही. सप्टेंबरमध्ये डाळींच्या भावाने उच्चांक गाठल्यानंतर केंद्र सरकारने साठेबाजांवर धाडसत्र सुरू केले. त्यानंतर राज्य सरकारनेही धाडी टाकल्या. त्यात हजारो टन डाळ जप्त झाली. ती शंभर रुपये किलोने विकण्याची घोषणाही झाली. मात्र, ती सत्यात उतरली नाही. रेशनवर डाळ देण्याचे केवळ आश्वासन वारंवार देण्यात आले. त्याचे पुढे काय झाले, ते सर्वांनाच माहीत आहे. डाळींचे दर नियंत्रणात आणण्यासाठी निविदा काढण्यात आल्या. त्यानंतर आयातही झाली. मात्र, डाळींचे दर काही उतरले नाहीत. सरकारने डाळीला क्विंटलमागे २७५ रुपये हमीभाव दिला आहे. त्यामुळे त्यांचा बाजारात पुरवठा वाढेल, अशी अपेक्षा आहे.भारतात डाळींचे १.८ ते १.९ कोटी टन उत्पादन होते. त्यामुळे देशांतर्गत गरज पूर्ण करण्यासाठी ३० ते ४० लाख टन मालाची आयात करावी लागते. > 1964-65साली देशाची लोकसंख्या ४७.४ होती, तर कडधान्याचे उत्पादन १२.४२ दशलक्ष टन होते. आता देशाची लोकसंख्या १२५ कोटींपेक्षा अधिक असताना, कडधान्याचे उत्पादन २० दशलक्ष टन एवढेही नाही. त्या वर्षाची स्थिती लक्षात घेतली, तर आज कडधान्याचे उत्पादन किमान ३२ दशलक्ष टन असायला हवे होते. थोडक्यात, कडधान्याच्या उत्पादनातील तूट ३३ टक्क्यांपेक्षा जास्त आहे.