शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

यंदा गणेशभक्तांकरिता कोकणात ८५० जादा बस

By admin | Updated: July 22, 2016 02:41 IST

कोकणात जाण्यासाठी यंदा महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागामार्फत सुमारे ८५० एसटी बसेस सोडण्यात येणार आहेत.

पंकज रोडेकर,

ठाणे- गणेशोत्सवात चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी यंदा महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागामार्फत सुमारे ८५० एसटी बसेस सोडण्यात येणार आहेत. यामध्ये सर्वाधिक३०० गाड्या बोरीवली डेपोतून सुटणार असून या बसगाड्यांचे आरक्षण महिनाऊर अगोदर घरबसल्या मोबाइल अ‍ॅपवरून करता येणार आहे. गुहागरला जाण्याकरिता आरक्षण करण्यासाठी सर्वाधिक गर्दी आहे. त्यालाच प्रवाशांची पहिली पसंती आहे.गणपती बाप्पांचे ५ सप्टेंबरला आगमन होत आहे. कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांकरिता एसटीकडून गतवर्षी दीडशे बसगाड्यांचे नियोजन केले होते. प्रत्यक्षात, तरीसुद्धा ८५ जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या. ही बाब लक्षात घेऊन यंदा ठाणे विभागातील ८ डेपोंमधून ८५० बस सोडण्याचे नियोजन केले आहे. याखेरीज, जादा बसफेऱ्या सोडण्याची शक्यताही विभागाने वर्तवली आहे. या ८ डेपोंतून ३१ आॅगस्ट ते ५ सप्टेंबरदरम्यान या जादा फेऱ्या सोडण्यात येणार आहेत. त्यासाठी जादा गाड्यांचे आरक्षण एक महिना अगोदर संगणकाद्वारे उपलब्ध करून दिले आहे. ४० दिवस अगोदर ग्रुपचे आरक्षण करता येणार आहे. त्यासाठी आगार व्यवस्थापकांकडे संपर्क साधावा लागणार आहे. गणेशभक्तांच्या सोयीसाठी खाजगी एजंटमार्फतदेखील आरक्षण सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्याचबरोबर परतीच्या आरक्षणासाठी व्यवस्था उपलब्ध करून दिली असून परतीचा प्रवास हा १० ते १५ सप्टेंबरदरम्यान असणार आहे. त्यामुळे सुरक्षित प्रवासाकरिता प्रवासाची तारीख निश्चित करून एसटी बसने प्रवास करण्याचे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.।मोबाइल अ‍ॅपचाही वापरपरिवहन महामंडळाने अलीकडेच लांब व मध्यम लांब पल्ला तसेच लघु पल्ला मार्गावरील फेऱ्यांच्या आगाऊ आरक्षणासाठी मोबाइल अ‍ॅप उपलब्ध करून दिले आहे. टरफळउ टङ्मु’्रू फी२ी१५ं३्रङ्मल्ल अस्रस्र चा वापर करून वेळेची बचत होणार आहे. त्याचबरोबर तत्पर सेवा मिळणार आहे. हे अ‍ॅप रेल्वेच्या धर्तीवर असल्याने नागरिकांनी त्याचा जास्तीतजास्त लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.