शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

यंदा शाळांच्या सहली ‘पुस्तकाच्या गावी’

By admin | Updated: June 6, 2017 05:56 IST

शालेय स्तरापासून मुलांच्या हाती टॅब, स्मार्ट फोन्स असल्यामुळे विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागणार कशी, असा प्रश्न अनेकदा उपस्थित केला जातो

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : इंटरनेटच्या काळात पुस्तके वाचण्याचे प्रमाण कमी झाले आहे. शालेय स्तरापासून मुलांच्या हाती टॅब, स्मार्ट फोन्स असल्यामुळे विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागणार कशी, असा प्रश्न अनेकदा उपस्थित केला जातो. यंदाच्या शैक्षणिक वर्षात यावर तोडगा काढला जाणार आहे. ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून सरकारने जाहीर केलेल्या भिलारमध्ये शालेय सहली नेण्यासाठी मुख्याध्यापक संघटना पुढाकार घेणार आहेत. काहीच दिवसांपूर्वी शालेय सहलींसाठी ऐतिहासिक स्थळांची, ज्ञान मिळेल अशा स्थळांची निवड करण्यात यावी, असा जीआर शासनाने काढला होता. त्यामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सहली कुठे जाणार, याची उत्सुकता सगळ्यांनाच होती. आता त्यात भिलार गावाचे नाव पुढे आहे. गेल्या काही वर्षांत शालेय सहलींच्या स्वरूपात बदल झाला होता. वॉटर पार्क, रिसॉर्ट अशा ठिकाणी सहली नेण्याचा शाळांचा कल असायचा, पण मजा-मस्ती सोडल्यास विद्यार्थ्यांना या सहलीतून काहीही शिकायला मिळत नव्हते. त्यामुळे शासनातर्फे हा जीआर काढण्यात आला होता. महाराष्ट्र शासनाने निसर्ग आणि स्ट्रॉबेरीचा गोडवा जपणाऱ्या महाबळेश्वरजवळील भिलार गावाची निवड ‘पुस्तकाचे गाव’ म्हणून केली. विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी, म्हणून भिलार गावी सहली नेण्याचा विचार मुख्याध्यापकांनी मांडला आहे. पुुस्तकांच्या गावात कथा, कादंबरी, ललित लेखन, क्रीडाविषयक ज्ञान, विज्ञान, वैचारिक आणि अन्य अनेक ग्रंथ व पुस्तके उपलब्ध आहेत. त्याचबरोबर, वाचकांची तिथे वाचनासह राहण्याची सोय करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होऊन, वाचन संस्कृतीचे संवर्धन होण्यासाठी पुढील शैक्षणिक वर्षात शिक्षक, शिक्षक परिषदेच्या वतीने पुढाकार घेऊन, शाळांच्या सहली भिलार येथे काढण्यासाठी शाळांमध्ये जागृती करणार असल्याचे परिषदेचे अनिल बोरनारे यांनी सांगितले.पुस्तकांच्या गावाला ६ जून रोजी शिक्षक भेट देणार आहेत. मुंबईतल्या शाळांतले काही शिक्षक या भेटीत सहभागी होणार आहेत. >महाराष्ट्र मराठी माध्यमिक अध्यापक संघाने पुस्तकाचे गाव याविषयी जनजागृती व्हावी, यासाठी ‘पुस्तकाच्या गावा’वर विशेषांकही काढला आहे. लवकरच या विशेषांकाचे प्रकाशनही करण्यात येणार आहे.