शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

यंदा गोविंदांची घागर उताणीच

By admin | Updated: August 26, 2016 02:07 IST

हंडी फोडण्यासाठी बघ्यांची गर्दी, काळजाचा ठोका चुकविणारा क्षण असे हे चित्र गेल्या वर्षीपर्यंत पहायला मिळत होते.

प्रत्येक ठिकाणी गोविंदांचा जल्लोष, बक्षीस जिंकण्यासाठी पथकांमधील चुरस, हंडी फोडण्यासाठी बघ्यांची गर्दी, काळजाचा ठोका चुकविणारा क्षण असे हे चित्र गेल्या वर्षीपर्यंत पहायला मिळत होते. मात्र या वर्षी दहीहंडी उत्सवाला नियमांची अट घातल्याने गोविंदांचा थरथराट पाहण्याची संधी मुकली. आयोजकांनीही शासनाच्या नियमाचे पालन करत यंदा दहीहंडी उत्सव साजरा न करण्यातच धन्यता मानली. नवी मुंबई परिमंडळ एक परिसरात ४० दहीहंडी तर परिमंडळ दोन परिसरात १४० दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. उत्सवातून जपली परंपरापामबीच मार्गावरील मोराज सर्कल येथे दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी नाखवा सीताराम भगत सांस्कृतिक मंडळाची ‘सोनखारची हंडी’ मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. वर्षानुवर्षे चालत आलेल्या परंपरेनुसार साधेपणाने दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. ढोल-ताशांचा गजर, गोविंदांचा जल्लोष आणि दहा फुटांची हंडी फोडून आधुनिकतेमध्ये सांस्कृतिक वारसा जपण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी उत्सवाचे संस्थापक दशरथ भगत, नगरसेविका वैजयंती भगत, अध्यक्ष निशांत भगत आदी उपस्थित होते. शाळांमध्येही जल्लोषशहरातील अनेक शाळांमध्ये आज रोजचे तास न घेता दहीहंडी उत्सव साजरा केला. यामध्ये विद्यार्थ्यांनी लहान थर रचून हंडी फोडली आाणि गोविंदाच्या गाण्यावर ताल धरला. अनेक शाळांनी सामाजिकतेचे भान जपत उत्सवातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला. सोसायट्यांचा पुढाकारबालगोपाळांमध्ये असलेले दहीहंडीचे आकर्षण. हंडी फोडण्यासाठी चिमुकल्यांमध्ये असलेला उत्साह, उत्सवाचे पारंपरिक महत्त्व कळावे याकरिता शहरातील सोसायट्यांमध्ये यंदा साध्या पध्दतीने दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. चिमुकल्यांनी पारंपरिक वेशभूषेत दहीहंडी उत्सव साजरा केला. पोलीस यंत्रणा सज्ज उत्सवादरम्यान गैरप्रकार घडू नये याकरिता पोलीस यंत्रणा सज्ज होती. आवश्यक ठिकाणी नाकाबंदी, वाहनांची कसून तपासणी करण्यात आली. मद्यपी चालकांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस उप आयुक्त प्रशांत खैरे यांनी दिली.