शहरं
Join us  
Trending Stories
1
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
2
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
3
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
4
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
5
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
6
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
7
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
8
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
9
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
10
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
11
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
12
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
13
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
14
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
15
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
16
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
17
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
18
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
19
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
20
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स

यंदा हज यात्रेसाठी कमिटीच्या कोट्यात २५ हजारांनी वाढ

By admin | Updated: March 20, 2017 03:44 IST

हज कमिटी आॅफ इंडियाच्या वतीने हज यात्रेसाठी जाऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी खूशखबर आहे. या समितीचा कोटा तब्बल २५ हजारांनी वाढविण्यात आला

जमीर काझी / मुंबईहज कमिटी आॅफ इंडियाच्या वतीने हज यात्रेसाठी जाऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी खूशखबर आहे. या समितीचा कोटा तब्बल २५ हजारांनी वाढविण्यात आला असून, यंदा सव्वा लाख यात्रेकरूंना पाठविण्यात येणार आहे. हज कमिटीच्या समितीने सौदी सरकारबरोबर या यात्रेसंबंधी नुकताच तीन वर्षांचा करार केला आहे. त्यामध्ये हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, मदिना येथील धार्मिक विधीवेळी सर्वांना मस्जिद-ए-नवबी (मरकजिया) प्रत्येक यात्रेकरूची सातशे रियाल (सौदी रियाल)मध्ये निवासाची व्यवस्था केली जाणार आहे. त्यामुळे भाविकांची होणारी पायपीट थांबणार आहे.इस्लाम धर्मीयांमध्ये महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या हज यात्रेचा मुख्यविधी यावर्षी ३१ आॅगस्ट ते २ सप्टेंबरमध्ये होत आहे. त्यासाठी देशभरातील पाच लाखांवर इच्छुकांकडून आॅनलाइन अर्ज आले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.इस्लाममधील पाच प्रमुख तत्त्वांपैकी हज यात्रा ही एक महत्त्वाचे तत्त्व असून, हज कमिटी आॅफ इंडियातर्फे त्याबाबतची प्रकिया राबविली जाते. आतापर्यंत हा विभाग परराष्ट्र मंत्रालयाच्या अखत्यारित होता. या वर्षापासून मात्र, तो अल्पसंख्याक विकास विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. मदिना येथे बांधकाम सुरू असल्यामुळे गेल्या तीन-चार वर्षांपासून हज कमिटीचा कोटा कमी करून १ लाखांवर आणण्यात आला होता. त्यामुळे अनेकांना जादा रक्कम मोजून खासगी टूर्स कंपनीच्या मार्फत जावे लागत होते. हज कमिटीचे अध्यक्ष चौधरी मेहबूब अली कैसर यांच्या नेतृत्वाखाली पाच जणांच्या पथकाने सौदी अरेबियाला जात, हज यात्रेचे नियोजन करणाऱ्या संस्थेशी २०१७ ते २०२० या कालावधीकरिता करार केला. त्यानुसार, मक्केतील बहुतांश बांधकामे पूर्ण होत आल्याने, हज कमिटीसाठी पूर्ववत १ लाख २५ हजार यात्रेकरूंचा कोटा, तसेच प्रवासात(अरफात) एअर कुलर, आग प्रतिबंधत यंत्र आणि नाश्ता व भोजनाची व्यवस्था पुरविण्याबाबत निर्णय घेण्यात आला. त्यासाठी सुरुवातीला प्रत्येक यात्रेकरूसाठी ४०० रियालचा प्रस्ताव होता. मात्र, चर्चेनंतर तो २०० रियाल इतका करण्यात आला. त्याचप्रमाणे, ‘मरकजिया’ येथील निवासासाठीचे ७५० ते १ हजार रियालचा दर ७०० रुपये इतका निश्चित करण्यात आला.शिष्टमंडळाने सौदीतील भारतीय राजदूत व मुंबईचे माजी पोलीस आयुक्त जावेद अहमद, कौन्सल जनरल जेद्दाह नूर रहमान शेख, कौन्सल (हज) शाहीद आलम यांच्याशी चर्चा केली.