शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

यंदाचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रवेश सीईटीद्वारेच - विनोद तावडे

By admin | Updated: May 24, 2016 18:54 IST

राज्य शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या सामायिक प्रवेश परीक्षेद्वारेच (सीईटी) देण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 24 - या वर्षीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 2810 जागांवरील प्रवेश 5 मे, 2016 रोजी राज्य शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या सामायिक प्रवेश परीक्षेद्वारेच (सीईटी) देण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले आहे.आज मंत्रालयात नीटच्या अध्यादेशाबाबत विनोद तावडे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी नीट परीक्षेबाबत आणि राज्य शासनाच्या भूमिकेबाबत माहिती दिली.विनोद तावडे म्हणाले की, महाराष्ट्राच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अखत्यारित असलेल्या 2810 जागांवरील प्रवेश सीईटीद्वारे होण्याचा मार्ग मा. राष्ट्रपती यांच्यामार्फत काढण्यात येणाऱ्या अध्यादेशामुळे मोकळा झाला आहे. खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील 1720 व अभिमत विद्यापीठातील 1675 अशा एकूण 3395 जागा या नीट परीक्षेद्वारेच भरल्या जाणार आहेत. या वर्षीच्या राज्य शासनाच्या जागा सीईटी परीक्षेद्वारे भरल्या जाणार असल्याने याचा फायदा ग्रामीण भागातील गरीब होतकरु विद्यार्थ्यांना होणार असून,  या विदयार्थ्यांना सुद्धा वैदयकीय प्रवेशाची संधी उपलब्ध होणार आहे.खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शासनाच्या जागा या राज्य सीईटीमार्फत भरल्या जातील असे जे विधान केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी केले आहे. त्याबद्दल स्पष्टीकरण देताना विनोद तावडे यांनी सांगितले की, हा विषय महाराष्ट्रासाठी लागू होत नाही. खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमधील जागा या राज्य सरकारमार्फत भरल्या जात नाहीत. या जागांवर राज्य सरकारचे नियंत्रण नाही. त्यामुळे या महाविद्यालयातील जागा एमएच-सीईटी प्रवेश परीक्षेमार्फत भरण्याचा प्रश्न उद्भवत नाही. कर्नाटकमध्ये खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील 40 टक्के जागा या सरकारमार्फत भरल्या जातात. आंध्र प्रदेशमध्ये 50 टक्के जागा या शासनाच्या ताब्यात असतात. त्यामुळे हा विषय त्यांच्याकरिता लागू आहे. महाराष्ट्रामध्ये खासगी आणि अभिमत वैद्यकीय महाविद्यालयातील जागा या नीटच्या माध्यमातूनच भरल्या जाणार आहेत असेही, विनोद तावडे यांनी सांगितले.राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केलेला अध्यादेश वितरीत झाल्यानंतर उद्या महाराष्ट्र सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल करण्यात येईल. जेणेकरून अध्यादेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाल्यास या प्रकरणात राज्य सरकारची बाजू न्यायालयात मांडता येईल, असेही विनोद तावडे यांनी स्पष्ट केले.शिक्षणतज्ज्ञांमार्फत परीक्षा पद्धतीत बदल करण्याचा विचारपुढील वर्षांपासून वैदयकीय प्रवेश नीट परीक्षेच्या गुणांवर दिले जाणार आहेत. एनसीईआरटीच्या नियमाप्रमाणेच एचएससी व सीबीएससी बोर्डाचा अभ्यासक्रम आहे. अकरावी व बारावी अभ्यासक्रमाच्या धर्तीवरच नीटची प्रश्नपत्रिका तयार होते. त्यामुळे पुढच्या वर्षीपासून येणाऱ्या नीटच्या पार्श्वभूमीवर आपण उच्च माध्यमिक (एचएससी) बोर्डाच्या अध्यक्षांना अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धतीत काय बदल करता येऊ शकेल याबाबत शिक्षणतज्ज्ञांची बैठक घेणार आहृोत. मात्र असे करीत असताना विदयार्थ्यांच्या सामान्य बुध्दी ते सर्वोच्च बुध्दी यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे असेही, श्री. तावडे यांनी यावेळी स्पष्ट केले.