शहरं
Join us  
Trending Stories
1
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
2
'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही', CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
3
१ जुलैपूर्वी तिकीट काढलं असेल तर प्रवाशांना द्यावे लागतील अतिरिक्त पैसे? अखेर रेल्वेने केलं स्पष्ट
4
इराण-इस्रायल युद्धबंदीनंतर सोन्याच्या किमतीत पहिल्यांदाच सर्वात मोठी वाढ! चांदीही चमकली!
5
नाना पटोले एका दिवसासाठी निलंबित, विधानसभा अध्यक्षांची कारवाई; अधिवेशनात पहिल्याच दिवशी काय घडलं?
6
ENG vs IND : १२३ वर्षांत जे घडलं नाही ते करून दाखवण्याचं चॅलेंज; इथं पाहा टीम इंडियाचा रेकॉर्ड
7
वनप्लस पुन्हा एकदा डबल धमाका करणार; एकात वनप्लस १३ चा कॅमेरा? कोणते फोन येतायत...
8
हुंड्यासाठी पती झाला हैवान! दागिने, AC साठी टॉर्चर; लग्नानंतर ३ दिवसांनी नववधूने संपवलं जीवन
9
पतीशी भांडण करून दुसऱ्या खोलीत झोपली पत्नी; मध्यरात्री पतीला आली जाग, खोलीत डोकावून पाहताच... 
10
आषाढी एकादशीला प्रवासी सेवेसाठी येणाऱ्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांना भोजन मोफत 
11
'मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी', विधानसभेच्या कामकाजावर विरोधकांचा दिवसभरासाठी बहिष्कार
12
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताय? फक्त परतावा नका पाहू, 'या' १० गोष्टी तपासाच! अन्यथा पैसे जातील पाण्यात
13
५०० वर्षांनी गुरु-शनिचा पॉवरफूल योग: ९ राशींचे कल्याण, अपार लाभ; भरघोस भरभराट, बक्कळ पैसा!
14
'त्या' रात्री काय झालं? पतीला कसं मारलं? बॉयफ्रेंडसोबत पकडल्या गेलेल्या ९ मुलांच्या आईने 'असा' केला गुन्हा कबूल! 
15
कॉलर पकडली, फरफटत नेलं, बेदम मारलं; भाजपा नेत्याच्या समर्थकांची आयुक्तांना मारहाण
16
'आभाळमाया'तील चिंगीला असा मिळाला 'बाजीराव मस्तानी', सेटवर संजय भन्साळी चिडले तेव्हा...
17
फक्त एक फोन लीक झाला अन् 'या' देशाच्या पंतप्रधानांना पदावरून हटवलं; नेमकं काय घडलं?
18
कर्नाटक काँग्रेसमध्ये हालचालींना वेग! 'डीके शिवकुमार यांच्यासोबत १०० आमदार'; नेत्याच्या दाव्यामुळे हायकमांड बंगळुरुमध्ये पोहोचले
19
Shefali Jariwala : "परागला चौकशीला जावं लागेल", शेफालीच्या मैत्रिणीनं पोस्टमार्टम रिपोर्टबाबत केले खुलासे, म्हणाली - "काहीतरी गडबड.."
20
"केंद्रात सत्ता येताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालणार’’, काँग्रेसच्या बड्या नेत्याने दिले स्पष्ट संकेत 

कार्तिकी वारीवर यंदा ९० कॅमेऱ्यांची नजर

By admin | Updated: November 7, 2016 06:15 IST

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व परिसर, श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप, पत्राशेडपर्यंतची दर्शन रांग, चंद्रभागा वाळवंट आदी ठिकाणांवर लक्ष ठेवण्यासाठी मंदिर समितीने ९० ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत़

पंढरपूर (जि. सोलापूर) : येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व परिसर, श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप, पत्राशेडपर्यंतची दर्शन रांग, चंद्रभागा वाळवंट आदी ठिकाणांवर लक्ष ठेवण्यासाठी मंदिर समितीने ९० ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत़ त्यापैकी ६५ हे कायमस्वरुपी, तर २५ तात्पुरते आहेत. तसेच मंदिरात आणि संत तुकाराम भवन असे दोन नियंत्रण कक्ष तयार करण्यात आले आहेत़कार्तिकी वारीच्या निमित्ताने पंढरपूर शहरात श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढत आहे़ सर्व भाविकांना शिस्तीबद्धपणे दर्शन व्हावे, यासाठी मंदिर समितीने संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप आणि तेथून स्कायवॉक अशी दर्शन रांगेची सोय केली आहे़ शिवाय मंदिर समितीचे कायमस्वरूपी चार पत्राशेड असून, आता यात्रा कालावधीसाठी तात्पुरते पाच पत्राशेड उभारण्यात आले आहेत़ या ठिकाणी दर्शन रांगेत घुसखोरी, धक्काबुक्की, चोरी, भाविकांना भोवळ येणे, अशा घटना घडतात. त्यावर सीसीटीव्हीची नजर असेल़ दर्शन रांगेत असा प्रकार होताना आढळल्यास नियंत्रण कक्षातून वॉकीटॉकीद्वारे संवाद साधून त्यावर तात्काळ उपाययोजना करण्यासाठी सीसीटीव्हीची मदत होणार आहे़विशेष म्हणजे यंदा चंद्रभागा वाळवंटातील घडामोडी टिपण्यासाठी महाद्वार घाटावरील हायमास्ट दिव्यावर ‘फोकल लेंथ’चे चार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत़ तेथे ते कायमस्वरुपी असतील़ या कॅमेऱ्यामुळे चंद्रभागा पात्रातील घटना, घडामोडींवर लक्ष ठेवणे सोपे होणार आहे़ तसेच नदीपात्रातून होणारा बेकायदा वाळू उपसा रोखण्यास मदत होणार आहे़ (प्रतिनिधी)एलईडी स्क्रीनवरून दर्शनज्या भाविकांना रांगेतून पददर्शन घेणे शक्य होणार नाही, ते भाविक नामदेव पायरी, कळस दर्शन घेतात़ यंदा नामदेव पायरी येथे मोठी एलईडी स्क्रिनद्वारे पांडुरंगाच्या दर्शनाची सोय मंदिर समितीने केली आहे़ नामदेव पायरी दर्शन घेतानाच एलईडी स्क्रीनवरून पांडुरंगाचे दर्शन मिळणार आहे़