शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
6
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
7
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
8
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
9
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
10
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
11
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
12
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
13
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
14
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
15
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
16
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
17
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
20
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...

यंदाच्या वर्षी ६० हजार शौचालये बांधण्याचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2016 20:48 IST

जिल्ह्यात शौचालये बांधण्याचे प्रमाण वाढू लागले आहे़ जिल्हा परिषदेतील स्वच्छ भारत मिशन कक्षाच्या वतीने विविध कार्यक्रम राबवून ही मोहिम पुढे रेटली आहे़

राजेंद्र अहिरे: संपूर्ण जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी कृती आराखडा तयार- शिवाजी सुरवसे सोलापूर, दि. ५ : जिल्ह्यात शौचालये बांधण्याचे प्रमाण वाढू लागले आहे़ जिल्हा परिषदेतील स्वच्छ भारत मिशन कक्षाच्या वतीने विविध कार्यक्रम राबवून ही मोहिम पुढे रेटली आहे़ गतवर्षी ३३ हजार ८४२ शौचायले बांधलेल्या सोलापूर जिल्ह्याने यंदाच्या वर्षी ६० हजार ७१३ शौचालये बांधण्याचे नियोजन केले आहे़ त्यामुळे येत्या दोन वर्षात संपूर्ण सोलापूर जिल्हा हागणदारीमुक्त होईल असा विश्वास जि़प़ उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता कक्ष) राजेंद्र अहिरे यांनी ह्यलोकमतह्ण ला सांगितले़प्रश्न: बेसलाईन सर्व्हेमधील आकडेवारी आणि सध्याची शौचालयाची परिस्थिती याबाबत काय सांगाल ?-शौचायल बांधण्याची चळवळ जिल्ह्यात रुजू होत आहे़ २०१२ साली केलेल्या बेसलाईन सर्व्हेनुसार जिल्ह्यात पाच लाख ६४५७ कुटूंबे होती़ त्यापैकी २ ला ९१ हजार ९९ कुटूंबांकडे वैयक्तिक शौचालये नव्हती़ सध्याची आकडेवारी पाहिली तर यामध्ये निश्चित चांगला बदल दिसेल़ सध्या गेल्या चार वर्षात सुमारे ८० हजार शौचालये बांधली आहेत़प्रश्न: यंदाच्या वर्षी किती शौचायले बांधणार आहात त्यासाठी काय नियोजन केले आहे ?-सन २०१६-१७ या वर्षात ६० हजार ७१३ वैयक्तिक शौचायले बांधण्याचे नियोजन केले आहे़ गतवर्षातील १३ हजार शौचालयांचे कामे सुरू आहेत तर निर्मलग्राम झालेल्या गावांत १६ हजार शौचायले बांधावयाची आहेत त्यामुळे तसा विचार केला तर या वर्षभरात आम्हाला सुमारे ९० हजार शौचालये बांधावयाची आहेत़प्रश्न: शौचालये बांधणाऱ्यांना वेळेवर अनुदान दिले जात नाही अशा तक्रारी आहेत ?-तसे काही नाही़ काही ठिकाणी बँकांच्या चुका असल्यामुळे वेळ होतो़ जिथे तक्रारी असतील तिथल्या बँका आम्ही बदलून देत आहेत़ ग्रामसेवक, गटविकास अधिकाऱ्यांना याबाबत सिईओ यांनी देखील सूचना दिल्या आहेत़ शौचालये बांधण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून २२ कोटी मिळाले आहेत़ आम्ही केंद्राकडे ८० कोटींची मागणी केली आहे़ प्रश्न: सोलापूर जिल्हा संपूर्ण हागणदारीमुक्त कधी होईल ?-अद्याप २ ला १८ हजार ६१९ जणांकडे शौचालये नाहीत़ यंदाच्या वर्षी ९० हजार शौचालये बांधण्याचे नियोजन आहे़ त्यामुळे हागणदारीमुक्त गाव कृती आराखडा तयार केला आहे़ त्यानुसार संपूर्ण जिल्हा हागणदारीमुक्त होण्यासाठी सर्व पदाधिकारी, अधिकारी यांचे सहकार्य अपेक्षित आहे़ सिईओ डोंगरे यांनी देखील जिल्हा हागणदारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे त्यामुळे यावर्षी निम्मा जिल्हा हागणदारीमुक्त होईल उर्वरीत येत्या दीड ते दोन वर्षात संपूर्ण जिल्हा हागणदारीमुक्त केला जाईल़ यंदाच्या वर्षी बांधावयाची शौचालये कंसात शौचालये नसलेले कुटूंबे-अक्कलकोट -३३७७ (१९६८८)-बार्शी-४७७९ (२८२४८)-करमाळा-४४४२ (२१५४९)-माढा-४६२५ (२७०५८)-माळशिरस-४७१२ (४६८२९)-मंगळवेढा- ३१३१ (१६५६६)-मोहोळ-३७४८ (२९८२६)-पंढरपूर-१९१९२ (३५०६७)-सांगोला-५३९४ (३३०२०)-उत्तर सोलापूर-४२६७ (१३८७९)-दक्षिण सोलापूर-३०४६ (१५९४०)एकूण ६०७१३ (२८७६७०)