शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळच्या हायटेक उच्चभ्रू चोरांना वर्धेत अटक

By admin | Updated: August 4, 2014 00:48 IST

महागडा पोशाख व महागड्या गाडीचा वापर करून घरफोडी करणाऱ्या एका हायटेक टोळीला वर्धा पोलिसांनी जेरबंद केली आहे. तीन जणांचा समावेश असलेली ही टोळी यवतमाळ येथील असून

तिघांना अटक : सव्वापाच लाखांचा मुद्देमाल जप्त वर्धा : महागडा पोशाख व महागड्या गाडीचा वापर करून घरफोडी करणाऱ्या एका हायटेक टोळीला वर्धा पोलिसांनी जेरबंद केली आहे. तीन जणांचा समावेश असलेली ही टोळी यवतमाळ येथील असून त्यांच्याकडून ५ लाख २५ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे रोशन मोतीलाल क्षीरसागर (२१), पवन रवी पाईकराव (१९), सागर विजयराव राऊत (२१) तिन्ही रा. यवतमाळ अशी आहेत. अटक करण्यात आलेले तिघेही उच्चभ्रू परिवारातील असून ते महागड्या गाडीने येऊन दोन ते तीन दिवस पाळत ठेवून चोरी करीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकारातून त्यांनी विविध जिल्ह्यात चोरी केल्याची कबुली दिली आहे. शहरात सुरू असलेल्या घरफोड्यांच्या प्रकरणात अनेक आरोपींना अटक करण्यात आली; मात्र शहरातील काही मोठ्या चोऱ्यांचा सुगावा लागत नव्हता. या मोठ्या चोऱ्या उघड करण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. या चोऱ्यांचा शोध घेत असताना वर्धेतील बाळकृष्णनगर येथील अमर व्यंकटराव हिंगे यांच्याकडे घरफोडी झाली. हिंगे हे परिवारासह रोज सायंकाळी काही कालावधीकरिता घराला कुलूप लावून मंदिरात जात. याच वेळात चोरट्यांनी त्यांच्या घरातून सोन्याचे दागिने व रोख असा एकूण २ लाख २० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना घटनेनंतर काही तासांनी यवतमाळ मार्गावरील एका धाब्यावर तीन इसम जेवणाकरिता थांबल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर वर्धा शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे अन्वेषण विभागाच्या चमूने यवतमाळच्या दिशेने तपास सुरू केला. दरम्यान, यवतमाळ येथील वर्धा पोलिसांच्या खबऱ्याकडून एक अट्टल गुन्हेगारांची टोळी सध्या मोठ्या प्रमाणावर पैसे खर्च असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी यवतमाळ येथे सापळा रचून या चोरट्यांना अटक केली. या चोरट्यांना विचारपूस केली असता प्रारंभी त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. ताब्यात घेतलेल्या युवकांच्या घरांची झडती घेतली असता तेथे चोरीतील मुद्देमाल मिळून आला. तरीसुद्धा हे युवक गुन्हा केल्याचे नाकारत होते. त्यांना पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. ही कारवाई पोलीस अधीक्षक अनील पारसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एम.पी. बुराडे, सहायक पोलीस निरीक्षक बाबरे, ज्ञानेश्वर निशाने, जमादार गजानन लामसे, गजानन गहूकर, आकाश चुंगडे, धर्मेद्र अकाली, सचिन खैरकार, विशाल बंगाले यांनी केली. (प्रतिनिधी)