शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळच्या डॉक्टरची रिओ आॅलिम्पिकसाठी निवड

By admin | Updated: July 26, 2016 00:51 IST

ब्राझील येथे होणाऱ्या रिओ आॅलिम्पिक स्पर्धेसाठी यवतमाळमधील डॉ. राकेश चकुले यांची वैद्यकीय अधिकारी म्हणून आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीने निवड केली आहे.

- नीलेश भगत, यवतमाळ

ब्राझील येथे होणाऱ्या रिओ आॅलिम्पिक स्पर्धेसाठी यवतमाळमधील डॉ. राकेश चकुले यांची वैद्यकीय अधिकारी म्हणून आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीने निवड केली आहे. विशेष म्हणजे देशातील केवळ दोन डॉक्टरांना हा मान मिळाला आहे. या वेळच्या आॅलिम्पिक स्पर्धेला रिओ (ब्राझील) येथे आॅगस्ट महिन्यापासून सुरुवात होत आहे. खेळाडूंना होणाऱ्या ‘स्पोर्ट इन्ज्युअरी’च्या उपचारासाठी इंडियन आॅलिम्पिक कमिटीने (आयओसी) भारतातील दोन डॉक्टरांची निवड केली आहे. त्यात यवतमाळ येथील डॉ. राकेश शंकर चकुले व जयपूर येथील डॉ. रजत जांगीड यांचा समावेश आहे.यवतमाळच्या शिवनेरी सोसायटीतील रहिवासी व सध्या नवी मुंबई येथे प्रॅक्टिस करणारे डॉ. राकेश चकुले आॅर्थोपेडिक सर्जन म्हणून प्रसिद्ध आहेत. स्वत: फुटबॉलमध्ये राज्यस्तर व अ‍ॅथलेटिक्समध्ये विद्यापीठ स्तरावर त्यांनी प्रतिनिधित्व केले आहे. त्यांनी अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस केले आहे. मुंबईच्या नानावटी हॉस्पिटल येथून डी. आॅर्थो उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी रशिया येथून आॅर्थोपेडिकमध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. डॉ. चकुले यांनी स्पोर्ट्स मेडिसिन व इन्ज्युअरीमध्ये कौशल्य प्राप्त करण्यासाठी जर्मनी, स्वित्झरलँड, फ्रान्स, आॅस्ट्रिया, फिनलंड व रशिया या देशात कार्यशाळा केल्या आहेत.आॅलिम्पिक कमिटीने केली उपेक्षा- २०१३ मध्ये आयओसीने जगभरातील डॉक्टरांसाठी स्पोटर््स मेडिसिनचा डिप्लोमा सुरू केला. अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी खूप खर्च येणार होता. इंडियन आॅलिम्पिक कमिटीने विद्यार्थ्यांची शिफारस केल्यास त्यांना आयओसीतर्फे शिष्यवृत्ती मिळणार होती. मी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला व केवळ शिफारसपत्र मिळविण्यासाठी महाराष्ट्र आॅलिम्पिक कमिटी व इंडियन आॅलिम्पिक कमिटीकडे खूप प्रयत्न केले. मात्र मला शिफारसपत्र मिळाले नाही. तरीही उमेद न हारता मी जिद्दीने स्वखर्चाने हा अभ्यासक्रम पूर्ण केला. आज याच अभ्यासक्रमाच्या बळावर मला आॅलिम्पिकला जाण्याची संधी मिळाली आहे, असे डॉ. राकेश चुकले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.