शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ जि.प.चा पदभरती पेपर पुन्हा फुटला

By admin | Updated: November 23, 2014 00:34 IST

पेपरफूट प्रकरणाने राज्यभर गाजत असलेल्या यवतमाळ जिल्हा परिषदेत आता परिचर पदाच्या परीक्षेचा पेपर शनिवारी परीक्षा केंद्रातून फुटला. प्रश्नपत्रिका केंद्राबाहेर पाठविणाऱ्या विस्तार अधिकाऱ्याला

परिचर परीक्षा : प्रश्नपत्रिका केंद्राबाहेर पाठविणारा ताब्यातसतीश येटरे - यवतमाळपेपरफूट प्रकरणाने राज्यभर गाजत असलेल्या यवतमाळ जिल्हा परिषदेत आता परिचर पदाच्या परीक्षेचा पेपर शनिवारी परीक्षा केंद्रातून फुटला. प्रश्नपत्रिका केंद्राबाहेर पाठविणाऱ्या विस्तार अधिकाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. सहायक विक्रीकर आयुक्तांच्या जागरुकतेमुळे हा प्रकार उघड झाला असून संपूर्ण पदभरतीच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.जिल्हा निवड समितीच्यावतीने जिल्हा परिषदेंतर्गत विविध पदांसाठी पदभरती घेतली जात आहे. शनिवारी दुपारी परिचरांच्या ४५ जागांसाठी लेखी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला तब्बल १८ हजार १५३ उमेदवार प्रविष्ट झाले होते. यवतमाळ शहरातील तहसील चौकस्थित जिल्हा परिषद मुलींची शाळा (काटेबाईची शाळा) या परीक्षेचे केंद्र होते. तेथे पर्यवेक्षक म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयातील सांख्यिकी विस्तार अधिकारी विक्रम राऊत यांची नियुक्ती करण्यात आली होती. राऊत यांनी वर्ग खोलीत दुपारी २ वाजता विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेचे वितरण केले. मात्र त्यातील एका उमेदवाराची प्रश्नपत्रिकास्वत:कडे ठेवून घेतली. दुपारी २.१५ वाजताच्या सुमारास ही प्रश्नपत्रिका एका अज्ञात व्यक्तीद्वारे परीक्षा केंद्राबाहेर पाठविली. तत्पूर्वी ही प्रश्नपत्रिका सोडवून देण्याची गळ विस्तार अधिकारी राऊत याने मोबाईलवरून येथील सहायक विक्रीकर आयुक्त जगदीश पांडे यांना घातली. त्यानंतर लगेच ती अज्ञात व्यक्ती दुपारी २.३० वाजताच्या सुमारास पांडे यांच्याकडे आली. पेपर सुरू असताना प्रश्नपत्रिका बाहेर कशी आली, अशी विचारणा करीत सदर व्यक्तीला पकडण्याचा प्रयत्न पांडे यांनी केला. मात्र तो झटापटीत प्रश्नपत्रिका सोडून पळून गेला. त्यानंतर पांडे यांनी वडगाव रोड पोलीस ठाणे गाठून उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी विस्तार अधिकारी राऊत याला ताब्यात घेतले. पांडे यांच्या मोबाईलवर आलेला कॉल विस्तार अधिकारी राऊत यांचाच असल्याची खात्री करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी आपल्या पद्धतीने राऊत याच्याकडून प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. दरम्यान, राऊत याच्या घराची झडती घेऊन मोबाईल जप्त करण्यात आला. तसेच त्याच्या मोबाईलवरून केलेल्या कॉलची आणि व्हॉटस्अपची पडताळणी सायबर क्राईम शाखेमार्फत सुरू केली. तूर्तास चौकशी सुरू असून गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती यवतमाळचे एसडीपीओ राहुल मदने यांनी ‘लोकमत’ला दिली.यवतमाळ जिल्हा परिषदेच्या पदभरतीचा पेपर यापूर्वी औरंगाबाद येथे फुटल्याचे उघड झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी ११ जणांना ताब्यात घेतले होते. या प्रकरणानंतर पुन्हा जिल्हा परिषद पदभरतीचा पेपर फुटल्याने खळबळ उडाली आहे.