शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळमध्ये निवडणुकीत राडा!

By admin | Updated: October 16, 2014 04:58 IST

विधानसभा निवडणुकीत मतदानादरम्यान दोन ठिकाणी पोलिसांना मारहाण तर एका ठिकाणी मतदान कर्मचा-यांच्या कानशिलात लगावल्याची घटना घडली

यवतमाळ : विधानसभा निवडणुकीत मतदानादरम्यान दोन ठिकाणी पोलिसांना मारहाण तर एका ठिकाणी मतदान कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावल्याची घटना घडली. घाटंजी तालुक्यातील पार्डी नस्करी येथे गावकऱ्यांनी केलेल्या मारहाणीत उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी जखमी झाला. तर दिग्रस तालुक्यातील तुपटाकळी मतदान केंद्रावर माजी जिल्हा परिषद सदस्य महिलेने निवडणूक कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली. घाटंजी तालुक्यातील पार्डी नस्करी हे गाव आर्णी विधानसभा मतदारसंघात येते. पांढरकवडा उपविभागीय पोलीस अधिकारी भालचंद्र महाजन या केंद्रावर पोहोचले. तेथे गर्दी हटविण्याचा प्रयत्न करत असताना महाजन यांचा धक्का लागल्याने शंभू मारजी दडांजे (४०) हा खाली पडून बेशुद्ध झाला. त्यावेळी मध्यस्थीसाठी आलेल्या दीपक संभाराव निकडे यांना महाजन यांनी मारहाण केली. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी त्यांना धक्काबुक्की केली. त्यामुळे महाजन यांनी सिर्व्हीस रिव्हॉल्वर काढून लोकांवर ताणले. त्यामुळे ग्रामस्थांनी धक्काबुक्की करीत दगडफेक सुरू केली. ग्रामस्थांनी केलेल्या मारहाणीत महाजन यांच्यासह पोलीस शिपाई जखमी झाला आहे़ दुसऱ्या घटनेत पुसद तालुक्यातील गोपवाडी येथे मतदान केंद्रासमोरील गर्दी हटविण्याचा प्रयत्न करीत असताना संतप्त झालेल्या मतदारांनी सहायक पोलीस निरीक्षक बाळू संपती जाधवर यांना मारहाण केली. त्यामुळे त्याने लोकांवर बंदुक रोखली. त्यानंतर ग्रामस्थांनी मध्यस्थी केली.