शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
2
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
3
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
4
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
5
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
6
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."
7
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
8
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
9
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
10
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
11
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
12
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
13
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
14
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
15
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
16
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
17
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
18
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
19
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
20
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन

यवतमाळात इनामी काटा कुस्त्यांची विराट दंगल

By admin | Updated: November 21, 2014 00:52 IST

महाराष्ट्राचे सांस्कृतिक व क्रीडा वैभव असणाऱ्या लाल मातीतील कुस्ती स्पर्धांची परंपरा कायम राखत यवतमाळ जिल्हा कुस्तीगीर संघाने सलग ११ व्या वर्षी स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र

सात लाखांची लयलूट : स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा स्मृति स्पर्धा यवतमाळ : महाराष्ट्राचे सांस्कृतिक व क्रीडा वैभव असणाऱ्या लाल मातीतील कुस्ती स्पर्धांची परंपरा कायम राखत यवतमाळ जिल्हा कुस्तीगीर संघाने सलग ११ व्या वर्षी स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त इनामी काटा कुस्त्यांची विराट दंगल आयोजित केली आहे. येथील ऐतिहासिक हनुमान आखाड्याच्या प्रांगणात मंगळवार दि. २५ नोव्हेंबरला दुपारी १२ वाजतापासून हलगी-तुतारी आणि डफा या वाद्यांच्या गजरात स्पर्धेला प्रारंभ होणार आहे.या स्पर्धेत देशभरातील नामवंत मल्ल सहभागी होत आहेत. स्पर्धेसाठी प्रवेश विनामूल्य असून तब्बल सात लाख रुपयांच्या बक्षिसांची लयलूट होणार आहे. हनुमान आखाड्यातील दिवंगत कुस्तीगीर पहेलवान गोकुल वस्ताद, पहेलवान श्रीरामजी पचगाडे, पहेलवान भैय्यालालजी जयस्वाल, बब्बी पहेलवान, पहेलवान नथ्थुजी नासनुरकर, अब्दुल नजीर उर्फ बंठोल पहेलवान, मधुकर भेंडकर पहेलवान, गजानन भाटवडेकर पहेलवान, शेषरावजी अजमिरे पहेलवान, शाहू पहेलवान, शेख अब्दुल पहेलवान, गोसावी गुरुजी, परशरामजी तायडे गुरुजी, वसंतराव जोशी गुरुजी, नानासाहेब औदार्य, रमेश तिवारी, विजय मोगरकर आदींच्या स्मृतिनिमित्त मोठ्या प्रमाणात बक्षीसे ठेवण्यात आली आहे. पहिले बक्षीस ५१ हजार रुपये दिवंगत सुभाषदादा बाजोरिया यांच्या स्मरणार्थ प्रशांत बाजोरिया यांच्याकडून, दुसरे बक्षीस ४१ हजार रुपये अनवरसेठ लोधा यांच्यातर्फे, तिसरे बक्षीस ३१ हजार रुपये श्यामराव काळे स्मरणार्थ सुनिल काळे यांच्याकडून, चौथे बक्षिस २५ हजार रुपये शैलेष गुल्हाने आणि मुकुंद दंदे यांच्यातर्फे, पाचवे बक्षीस २० हजार रुपये राजलक्ष्मी मल्टिस्टेट को-आॅपरेटिव्ह बँकेतर्फे, सहावे बक्षीस १५ हजार रुपये जानमहमंद गिलाणी स्मरणार्थ जाफर गिलाणी यांच्याकडून, सातवे बक्षीस १० हजार रुपये आर.बी. कन्स्ट्रक्शन कंपनीकडून, आठवे बक्षीस ७ हजार रुपये विजय डांगे आणि धनंजय भगत यांच्यातर्फे, नववे बक्षीस ५ हजार रुपये महेश तांबे यांच्याकडून, दहावे बक्षीस ३ हजार रामचंद्र गजबे यांच्यातर्फे, अकरावे बक्षीस २ हजार रुपये सुरेश जयसिंगपुरे यांच्याकडून तर बारावे बक्षीस १ हजार रुपये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघातर्फे देण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त १००, २००, ३००, ४०० आणि ५०० रुपयांचे अनेक कुस्त्यांचे जोड लावून विजयी मल्लांना रोख बक्षीसे देण्यात येणार आहे. जास्तीत जास्त मल्लांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन यवतमाळ जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, सचिव अनिल पांडे यांनी केले आहे. (क्रीडा प्रतिनिधी)