शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ पोलिसांचा शिष्यवृत्ती पॅटर्न राज्यभरात

By admin | Updated: October 31, 2016 04:51 IST

कर्मचारी कल्याण निधीतून पोलिसांच्या पाल्यांना उच्च शिक्षणासाठी अनुदान आणि कर्ज उपलब्ध करून देणारा यवतमाळ जिल्हा पोलिसांचा शिष्यवृत्ती पॅटर्न संपूर्ण राज्यात लागू करण्यात आला

यवतमाळ : कर्मचारी कल्याण निधीतून पोलिसांच्या पाल्यांना उच्च शिक्षणासाठी अनुदान आणि कर्ज उपलब्ध करून देणारा यवतमाळ जिल्हा पोलिसांचा शिष्यवृत्ती पॅटर्न संपूर्ण राज्यात लागू करण्यात आला आहे. महासंचालकांनी सर्व ग्रामीण पोलीस दल आणि पोलीस आयुक्तालयांसाठी यासंबंधीचे आदेश जारी केले आहेत. पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना उच्च शिक्षणासाठी येणाऱ्या आर्थिक अडचणी सोडविण्याकरिता यवतमाळचे जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी पुढाकार घेतला. त्यांनी जिल्ह्यात पोलिसांच्या पाल्यांकरिता शिष्यवृत्ती योजना लागू केली. त्यानुसार २५ हजार रुपये अनुदान आणि ५० हजार रुपये शैक्षणिक कर्ज कर्मचारी कल्याण निधीमधून दिले जाते. २५ हजारांची परतफेड करावी लागत नाही. परंतु ५० हजारांच्या शैक्षणिक कर्जाच्या परतफेडीसाठी १२ हप्ते पाडून दिले जातात. या शिष्यवृत्ती व शैक्षणिक कर्ज योजनेसाठी कर्मचारी कल्याण निधीमध्ये प्रत्येकी दहा लाख या प्रमाणे २० लाखांच्या रकमेचे आरक्षण करण्यात आले आहे. यवतमाळ पोलिसांच्या या शिष्यवृत्ती पॅटर्नचा पोलीस महासंचालक कार्यालयाने सुमारे महिनाभर अभ्यास केला. त्यानंतर हा पॅटर्न स्वीकारून संपूर्ण राज्यासाठी तो लागू करण्यात आला आहे.पोलीस कल्याण निधीसाठी कर्मचाऱ्यांच्या पगारातून विशिष्ट रक्कम कपात केली जाते. याशिवाय ‘वेल्फेअर शो’च्या कार्यक्रमाच्या निमित्ताने काही रक्कम या खात्यात जमा होते. अनेक ठिकाणी या वेल्फेअर फंडाचे वेगवेगळे स्रोत असतात. त्यातून मोठी रक्कम गोळा होते. आता या उपक्रमामुळे हा निधी मुलांच्या शिक्षणासाठी वापरला जाईल. (प्रतिनिधी)