शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळच्या शेतकऱ्यांचे मुंबईत अर्धनग्न आंदोलन

By admin | Updated: July 23, 2014 00:59 IST

जुनी व नवीन कर्जे पुनर्गठीत करण्याची मागणी करत यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मंगळवारी आझाद मैदानात अर्धनग्न आंदोलन केले. शिवाय मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत उपोषण करण्याचा

मुंबई : जुनी व नवीन कर्जे पुनर्गठीत करण्याची मागणी करत यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मंगळवारी आझाद मैदानात अर्धनग्न आंदोलन केले. शिवाय मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत उपोषण करण्याचा इशारा आम आदमी पार्टी शेतकरी आघाडीने घेतला आहे.जुलैच्या मध्यापर्यंत पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांना तीनवेळा पेरणी करावी लागली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अशा शेतकऱ्यांना त्यांची जुनी व नवी कर्जे पुनर्गठीत करून आर्थिक मदत करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. मार्च महिन्यात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्ज वसुलीला स्थगिती देण्याचा निर्णय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतला होता. मात्र शासन त्याची अंमलबजावणी करत नसल्याचा आरोप संघटनेचे जिल्हा सचिव जितेश राठोड यांनी केला. शिवाय तीन वर्षांसाठी कर्जाचे पुनर्गठण करण्याचे आश्वासनही सरकारने दिले होते. त्याचे पालन सरकारने करावे, अशी मागणी राठोड यांनी केली आहे.दीड महिने पावसाने दडी मारल्याने यवतमाळ जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची गरज आहे. शिवाय जुन्या कर्जावरील व्याज माफ करून नवीन बिनव्याजी कर्ज मंजुरी देण्याची गरज आहे. शिवाय ज्या बँका शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी करणार नाहीत, त्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी राठोड यांनी केली आहे.