यवतमाळ : जिल्ह्यातील सात नगर परिषदांच्या अध्यक्षपदासाठी शनिवारी निवडणूक पार पडली. यातील तीन जागांवर काँग्रेसचे, तीन जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस तर एका जागेवर परिवर्तन विकास आघाडीचा उमेदवार विजयी झाला.
यवतमाळचे नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे सुभाष राय बिनविरोध निवडून आले. दारव्हामध्ये काँग्रेसचे अशोक चिरडे यांनी नगराध्यक्षपद कायम ठेवले आहे. आर्णीचे नगराध्यक्ष म्हणून काँग्रेसचे आरिज बेग विजयी झाले. पुसदमध्ये राष्ट्रवादीच्या माधवी गुल्हाने तर घाटंजीत चंद्रलेखा रामटेके निवडून आल्या. दिग्रसची जागा परिवर्तन आघाडीच्या सरिता धुव्रे यांनी पटकाविली. उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पाच जागा काँग्रेसने तर भाजपा व परिवर्तनने प्रत्येकी एक जागा मिळविली. (प्रतिनिधी)