शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

वैष्णवीचा सहा वर्षांत ६९ पदकांचा योगाप्रवास

By admin | Updated: June 21, 2016 00:17 IST

वैष्णवी आंद्रे या विद्यार्थिनीने वयाच्या १६व्या वर्षी विविध स्तरांवरील स्पर्धांमध्ये ६९ पदके पटकावली आहेत. चार देशांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.

पिंपरी : वैष्णवी आंद्रे या विद्यार्थिनीने वयाच्या १६व्या वर्षी विविध स्तरांवरील स्पर्धांमध्ये ६९ पदके पटकावली आहेत. चार देशांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. अलीकडेच वैष्णवीला महाराष्ट्र योग भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.बिजलीनगर येथे राहणाऱ्या वैष्णवीचे शिशू वर्ग ते दहावी असे शालेय शिक्षण ज्ञान प्रबोधिनीत झाले. पाचवीत असताना तिची क्रीडाकुलमध्ये निवड झाली. या काळात शाळेकडून होणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये भाग घेत असताना एका स्पर्धेत योगशिक्षक चंद्रकांत पांगारे उपस्थित होते. वैष्णवीची योग्यता ओळखून योगासन प्रकारासाठी तिची निवड केली व तिथूनच तिचा हा क्रीडाप्रवास सुरू झाला.(प्रतिनिधी)योगा क्रीडाप्रकाराची माहिती नव्हती. परंतु, सततच्या सरावाने त्यात आवड निर्माण होत गेली. योगा विषयात पदवी संपादन करायची आहे. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक मिळवायचे आहे. पांगारे सरांचे खूप मार्गदर्शन आहे. - वैष्णवी आंद्रेवैष्णवीने विविध प्रकारचे वॉर्मिंग अप सराव व एकूण १२२० प्रकारची सोपी, मध्यम, अवघड व अतिअवघड प्रकारच्या योगासनांचा अभ्यास पूर्ण केला आहे. तिने विविध ठिकाणी शिबिरात सहभाग घेऊन इतरांना प्रोत्साहन दिले आहे. तिने आंतराष्ट्रीय स्पर्धेमध्ये भाग घेऊन देशाचे नाव मोठे केले आहे. आतापर्यंत ७४ शिबिरांमध्ये सहभागदररोजच्या सरावामध्ये वॉर्मिंग अप सराव, योगासन, सूर्यनमस्कार, सर्किट ट्रेनिंग, फिटर फिटनेस सराव, एरोबिक्स आदी प्रकारांचा समावेश होतो. आतापर्यंत साधारण ७४ रिदमिक व आर्टिस्टिक योग प्रात्यक्षिक, विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या उद्घाटन, बक्षीस वितरण व इतर योग शिबिरांमध्ये सादरीकरण केले आहे. अनेक ठिकाणी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला आहे. कॉमनवेल्थ यूथ गेम (२००८) व योगगुरू रामदेवबाबा यांच्या समोर ९ मिनिटांत ६९६ आसनांचे प्रात्यक्षिक सादर केले आहे. फ्रान्स, साऊथ कोरिया, थायलंड व बँकॉक या देशात भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. यंदाच्या वर्षी उत्कृष्ट योगपटू म्हणून ‘महाराष्ट्र योग भूषण पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले आहे. पॅरिस (फ्रान्स) येथे झालेल्या २५व्या वर्ल्ड योगा कपमध्ये योगा, अ‍ॅथलेटिक्स, आर्टिस्टिक, रिदमिक व डान्स योगा या पाच प्रकारांत सहभाग घेत चार पदके मिळवली. यात भारताला चॅम्पियनशिप मिळवण्यामध्ये वैष्णवीचा मोठा वाटा आहे.