शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

म्हसळ्यात यश कर्णिक प्रथम

By admin | Updated: June 8, 2016 02:25 IST

दहावीचा निकाल जाहीर झाला असून तालुक्याचा एकूण निकाल ९०.२५ टक्के लागला.

म्हसळा : दहावीचा निकाल जाहीर झाला असून तालुक्याचा एकूण निकाल ९०.२५ टक्के लागला. यामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्र मांक आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार आमदार अवधूूत तटकरे यांच्या हस्ते आगरी समाजगृहात करण्यात आला. न्यू इंग्लिश स्कूल म्हसळा एकूण निकाल ९३.१५ टक्के लागला असून यश कर्णिक प्रथम आला असून त्याने ८८.२० टक्के गुण मिळविले. ऐश्वर्या सुतार द्वितीय, तिला ८७.२० टक्के , तर ८६ टक्के गुण मिळवून प्रणया खोत तृतीय आली. मागासवर्गीयांमध्ये जुई साळवी हिने ७३.८० टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम क्र मांक मिळविला. ८८.२० टक्के गुण मिळवून अंजुमन-ई-इस्लाम हायस्कूल म्हसळ्याचा अ.रहीम अ.रहमान घराडे हाही विद्यार्थी प्रथम आला असून द्वितीय क्र मांक सारा जाविद फनसमीयाने मिळविला असून तिला ८६.६० टक्के गुण मिळाले. तृतीय क्र मांकावर सुजाना परदेसी असून ८४ टक्के गुण मिळविले. शाळेचा एकूण निकाल ८९.१३ टक्के लागला. पी.एन.पी. हायस्कूलमध्ये ८४.६० टक्के गुण मिळवून रविना रिकामे प्रथम, अनमोल लाड ७९.४० द्वितीय, तृतीय सुयोग दुर्गवले ७८.४० टक्के तसेच जिजामाता हायस्कूल कोलवटमध्ये ऋ तिक शिंदे प्रथम ७२ टक्के, द्वितीय क्र मांक सागर पोस्टुरे ६९ टक्के, प्रतीक मोरे याने ६७ टक्के गुण मिळवून तिसरा क्र मांक पटकाविला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आ.अवधूत तटकरे यांनी अभिनंदन के ले.>सुएसो कुरुळ शाळेचा ७५ टक्के निकालअलिबाग : सु.ए.सो. कुरुळ माध्यमिक विद्यालयाचा मार्च २०१६ माध्यमिक शालान्त परीक्षेचा निकाल ७५ टक्के लागला आहे. एकूण २८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यातील २१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. श्रुती प्रभाकर सुजाता गोंधळी ही विद्यार्थिनी ७७.२० टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम आली आहे. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शाळेचे स्थानिक व्यवस्थापन समिती प्रमुख अ‍ॅड. प्रसाद पाटील व मुख्याध्यापिका सुजाता पाटील यांनी अभिनंदन केले आहे. >अग्रवाल विद्यामंदिर @ ९४.७० टक्केनागोठणे : महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागीय मंडळाकडून मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी आॅनलाइन जाहीर झाला. कोएसोच्या गुलाबबाई रामनिवास अग्रवाल विद्यामंदिरचा निकाल ९४.७० टक्के इतका लागला असून १८९ पैकी १७६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रसन्न वाघ हा विद्यार्थी ९०. ६० टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम आला, ऋ तुजा देवकाते ८८ टक्के गुण मिळवून द्वितीय, तर दीप्ती सकपाळने ८६ टक्के गुण मिळवून तृतीय क्र मांक मिळविला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जैन, सदस्य अनिल काळे, अब्बास नागोठणावाला, मुख्याध्यापक एस.पी. कांबळे यांच्यासह शिक्षकवर्गाने कौतुक केले आहे. भारतीय एज्युकेशन सोसायटीच्या एस.डी.परमार शाळेने १०० टक्के निकालाची परंपरा सलग तेराव्या वर्षीही कायम राखली आहे. मुस्कान धनसे आणि पायल खंडागळे या विद्यार्थिनींनी ८६.४० टक्के गुण मिळवून प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. मोमिना खान ८६ टक्के आणि राहुल श्रीवास्तव ८४. २० टक्के यांनी अनुक्र मे द्वितीय आणि तृतीय क्र मांक मिळविला. आठ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळविले असून प्रथम श्रेणीत नऊ विद्यार्थी आहेत.नवी सोशियल अ‍ॅन्ड एज्युकेशन ट्रस्टच्या होली एंजल्स शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. स्वामिनी जाधव ही विद्यार्थिनी ८९.४० टक्के गुण मिळवून शाळेत पहिली आली असून अभिझेर काचवाला आणि निधी भानुशाली ८७.२० टक्के, तर जतीन तेरडे ८५ टक्के गुण मिळवून अनुक्र मे द्वितीय आणि तृतीय क्र मांकाने उत्तीर्ण झाले. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा सीमा मुल्कवाड मुख्याध्यापक विजय मुल्कवाड आदींनी अभिनंदन केले आहे. शेतकऱ्याचा मुलगा अंबानी शाळेत प्रथमनागोठणे : पेण तालुक्यातील शिहू या खेडेगावातील दिलीप पाटील या शेतकऱ्याच्या निमिष या पुत्राने दहावीच्या परीक्षेत येथील जे.एच. अंबानी पेट्रोकेमिकल्स विद्यालयात प्रथम येण्याची किमया साधल्याबद्दल त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. निमिषने मिळविलेल्या यशाबद्दल शिहू गावाचे नाव निश्चितच उंचावले असल्याची प्रतिक्रि या सरपंच भास्कर म्हात्रे, पेण तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष वसंत मोकल, पेण तालुका भाजपाचे उपाध्यक्ष हिरामण मोकल यांनी व्यक्त केली आहे. निमिषच्या यशाबद्दल शिहू ग्रामपंचायतीच्या वतीने त्याचा कौतुक सोहळा घेण्यात येवून त्याचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सरपंच भास्कर म्हात्रे, पेण तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष वसंत मोकल आदी मान्यवरांसह ग्रामस्थ उपस्थित होते.