शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

याकूब रात्रभर जागाच होता

By admin | Updated: July 31, 2015 04:17 IST

कारागृहाच्या फाशी यार्डात बंदिस्त असलेला याकूब रात्रभर जागाच होता. सकाळी ५.५० वाजताच्या सुमारास सुरक्षारक्षकाने त्याला आंघोळ करून पूजा-प्रार्थनेची सूचना केली.

नागपूर : कारागृहाच्या फाशी यार्डात बंदिस्त असलेला याकूब रात्रभर जागाच होता. सकाळी ५.५० वाजताच्या सुमारास सुरक्षारक्षकाने त्याला आंघोळ करून पूजा-प्रार्थनेची सूचना केली. त्यानुसार याकूबने आंघोळीनंतर नवीन कपडे घालून नमाज पठण केले. नंतर त्याला नाश्ता देण्यात आला. डॉक्टरने तपासणी केल्यानंतर याकूबने धार्मिक पुस्तकाचे वाचन केले. यादरम्यान एका अधिकाऱ्याने याकूबशी संवाद साधत त्याला त्याची शेवटची इच्छा विचारली. त्यानंतर त्याला कोणत्या गुन्ह्याबद्दल फाशीची शिक्षा दिली जात आहे, त्याची आठवण करून देण्यात आली. त्याच्या हातून घडलेल्या गुन्ह्याचा पश्चात्ताप करून अल्लाह/ईश्वराकडे क्षमायाचना करण्याचेही सुचविण्यात आले. त्यानंतर याकूबला कारागृहातील सुरक्षारक्षकांनी फाशी यार्डातून बाहेर काढून त्याचे दोन्ही हात पाठीमागे बांधण्यात आले. वधस्तंभाकडे नेताना पुन्हा एकदा डॉक्टरांनी याकूबची वैद्यकीय तपासणी केली. त्याच्या तोंडावर काळा बुरखा घालून गळ्याभोवती फास टाकण्यात आला. या वेळी वधस्तंभाजवळ कारागृह महानिरीक्षक मीरा बोरवणकर, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, न्यायदंडाधिकारी गिरीश जोशी, कारागृह उपमहानिरीक्षक राजेंद्र धामने, अधीक्षक योगेश देसाई तसेच मेडिकलचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे आणि काही सुरक्षारक्षक उपस्थित होते. त्यांनी ठरल्या वेळेनुसार सकाळी ७ वाजता याकूबचा फास आवळण्यासाठी अधीक्षक देसाई यांनी ‘जल्लाद‘च्या भूमिकेतील कर्मचाऱ्याला इशारा केला. त्या कर्मचाऱ्याने वधस्तंभाचा खटका ओढताक्षणीच याकूबच्या पायाखालचा पाटा झटक्यात बाजूला झाला. त्यामुळे गळ्यातील फास आवळला गेल्याने याकूब वधस्तंभाच्या मधोमध असलेल्या खड्ड्यात लोंबकळला. काही क्षणांतच तो शांत झाला. सुमारे ३० मिनिटांनंतर डॉक्टरांनी याकूबची तपासणी करून तो मृत झाल्याचे घोषित केले. दोन मिनिटांचे मौन३० जुलै हा याकूबचा वाढदिवस. जन्मदिवशीच याकूबचा मृत्यू झाल्यानंतर तेथे उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी भारतीय संस्कृतीनुसार त्याच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून दोन मिनिटे मौन पाळले. त्यानंतर गृहमंत्रालयाला आणि याकूबच्या नातेवाइकांना फाशी देण्यात आल्याचे कळविण्यात आले. मुलीशी बोलला मोबाइलवर मृत्युदंडाची शिक्षा देण्यापूर्वी संबंधित आरोपीची अंतिम इच्छा पूर्ण करण्यात येते. याकूबला बुधवारी मध्यरात्री कारागृहाच्या अधिकाऱ्यांनी त्याची अंतिम इच्छा विचारली. मुलगी जुबेदा हिच्याशी बोलायचे आहे, असे याकूब म्हणाला. कारागृहाच्या अधिकाऱ्यांनी लगेच जुबेदाच्या मोबाइलवर संपर्क करून तिच्याशी याकूबचे बोलणे करून दिले. बापलेकीच्या या अंतिम संवादादरम्यान याकूबने जुबेदाला खूप शिकून मोठी हो, नाव कमव, असे आशीर्वाद दिल्याचे समजते.एक फुलका, चिकनचे दोन लेगपीस : बुधवारी रात्री चिकनचे लेगपीस अन् फुलका खायची इच्छा याकूबने व्यक्त केली. तातडीने गरमागरम चिकन अन् फुलके आणण्यात आले. याकूबने दोन लेगपीस अन् एक फुलका असे जेवण घेतले. सुलेमानही सुखावला. अधिकारीही आश्वस्त झाले. दोन्ही भाऊ अस्खलित इंग्रजीत एकमेकांशी बोलले.