शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
2
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
3
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
4
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
5
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
6
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
7
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
8
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
9
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
10
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
11
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
12
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
13
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
14
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
15
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
16
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
17
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
18
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
19
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
20
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा

याकुबसाठी बंजरगी भाईजानची टिवटिव!

By admin | Updated: July 27, 2015 01:28 IST

सर्व स्तरातून उमटलेली प्रतिक्रिया, शिवसेना-भाजपा कार्यकर्त्यांची निदर्शने आणि वडील सलीम खान यांच्या सल्ल्यानंतर सिनेअभिनेता

मुंबई : सर्व स्तरातून उमटलेली प्रतिक्रिया, शिवसेना-भाजपा कार्यकर्त्यांची निदर्शने आणि वडील सलीम खान यांच्या सल्ल्यानंतर सिनेअभिनेता सलमान खान याने १९९३च्या साखळी बॉम्बस्फोटांतील सिद्धदोष आरोपी याकूब मेनन याच्या फाशीच्या शिक्षेविरोधात केलेले वादग्रस्त टिष्ट्वट अखेर मागे घेतले. माझ्याकडून अनावधानाने एखादा गैरसमज पसरविला गेला असेल, तर त्याबद्दल मी विनाअट माफी मागतो, असेही त्याने म्हटले आहे. सलमानने चौदा टिष्ट्वट करून याकूबचा फरार भाऊ आणि स्फोटांचा मुख्य सूत्रधार टायगर याला फासावर लटकविण्यात यावे, याकूबला नव्हे, असे मत व्यक्त केले होते. त्या टिष्ट्वटवर सर्व स्तरांतून प्रतिक्रिया उमटली. सपाचे अबू आझमी यांनी त्याचे समर्थन केले, तर सेना-भाजपाने त्यावर तीव्र आक्षेप नोंदविला. सलमानने आपले टिष्ट्वट मागे घेतले नाही, तर त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही अ‍ॅड. निकम यांनी दिला होता.सलमानचे आधीचे ट्विटटायगरसाठी भावाला फासावर चढविण्यात येत आहे. अरे टायगर कुठे आहे? भारतात टायगरचीच कमतरता आहे. टायगरला आणा. मला तीन दिवसांपासून हे ट्विट करायचं होतं. पण मी घाबरत होतो. पण यात एका व्यक्तीचं कुटुंब गुंतलं आहे. भावाला लटकवू नका.आणि त्याला कुणीही कधीही टायगर म्हणू नका. तो त्या नावाच्या लायक नाहीए. त्यालाच लटकवा.नंतरचे ट्विटयाकूब निर्दोष असल्याचे म्हटले नव्हते. न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे. मुंबई स्फोटात अनेक लोकांचे बळी गेले होते. मी नेहमीच म्हणत आलो आहे, की एकाही निष्पाप व्यक्तीचा बळी हा मानवतेचा खून आहे.माझ्या वडिलांनी मला फोन केला आणि माझे ट्विट गैरसमज पसरवू शकतात, त्यामुळे मी ते मागे घ्यावेत, असे सांगितले. म्हणून मी ते मागे घेत आहे. माझ्याकडून अनावधानाने जर एखादा गैरसमज पसरविला गेला असेल, तर त्याबद्दल मी विनाअट माफी मागतो.माझे ट्विट धर्मविरोधी असल्याचे जे म्हणत आहेत, त्यांचा मी निषेध करतो. मी सर्व धर्मांचा आदर करत आलो आहे व यापुढेही करेन.मी माझ्या मुलाच्या मताशी अजिबात सहमत नाही. त्याने पूर्ण माहितीअभावी अशा गंभीर विषयांवर भाष्य करू नये, जनतेने त्याचे विधान गांभीर्याने घेऊ नये. - सलीम खान