शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’चे यदु जोशी रंगाअण्णा वैद्य पुरस्काराने सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 04:44 IST

पत्रकारिता समाजाचा आरसा असून, त्यात खूप मोठी विश्वासार्हता आहे. पत्रकारांनी पत्रकारिता करताना चुकीचे असेल तर लिहिलेच पाहिजे; मात्र स्पर्धेच्या घाईत कोणावर अन्याय होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे, असे मत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी व्यक्त केले.

सोलापूर : पत्रकारिता समाजाचा आरसा असून, त्यात खूप मोठी विश्वासार्हता आहे. पत्रकारांनी पत्रकारिता करताना चुकीचे असेल तर लिहिलेच पाहिजे; मात्र स्पर्धेच्या घाईत कोणावर अन्याय होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे, असे मत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी व्यक्त केले.सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने लोकमतचे विशेष प्रतिनिधी (मुंबई) यदू जोशी यांना पत्रमहर्षी रंगाअण्णा वैद्य पुरस्काराने तर ज्येष्ठ पत्रकार संजय पाठक यांना स्व. बाबूराव जक्कल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी तावडे बोलत होते. हिराचंद नेमचंद येथील अ‍ॅम्फी थिएटर येथे झालेल्या सोहळ्यास पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख, पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे उपस्थित होते.पत्रकारिता ही एक मोठी जबाबदारी आहे. पत्रकारिता हे एक स्वीकारलेले व्रत असून, समाजव्यवस्थेवर प्रहार करताना सकारात्मक आणि नकारात्मक या दोन्ही गोष्टींचा विचार केला पाहिजे. ज्या बातमीत तथ्य आहे ती देऊन चुकीच्या गोष्टींवर आसूड ओढला पाहिजे. प्रामाणिक पत्रकारांची संख्या वाढली पाहिजे. शासन अनेक चांगल्या गोष्टी राबवत आहे, त्या समाजासमोर आणल्यास चांगल्या भावना निर्माण होतील. सकारात्मक बातम्या सर्वसामान्य जनतेचा आत्मविश्वास वाढवतात, असेही तावडे यांनी सांगितले.