शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

इंग्रजांनी लिहिलेला इतिहास चुकीचा

By admin | Updated: January 7, 2017 01:10 IST

इंग्रजांनी स्वत:च्या फायद्यासाठी चुकीचा इतिहास लिहून मराठ्यांना बदनाम करण्याचे कारस्थान रचले

वाघोली : अठरापगड जाती असलेल्या मराठ्यांच्या कर्तबगारीचा इतिहास जगाला कळू नये म्हणून इंग्रजांनी स्वत:च्या फायद्यासाठी चुकीचा इतिहास लिहून मराठ्यांना बदनाम करण्याचे कारस्थान रचले, असे प्रतिपादन ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सदानंद मोरे यांनी केले.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि भारतीय जैन संघटना महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने गुणवत्ता सुधार योजनेअंतर्गत ‘१८व्या शतकातील मराठी सत्तेचा विस्तार’ या विषयावर दोन दिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन वाघोली येथे करण्यात आले होते. चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी मोरे बोलत होते. सुभेदार पिलाजीराव जाधवराव यांचे वंशज रामचंद्र जाधवराव, प्राचार्य नंदकुमार निकम, शांतीलाल बोरा, प्राचार्य बाबासाहेब सांगळे, उपप्राचार्य किशोर देसरडा, इतिहास विभागप्रमुख भूषण फडतरे, दीपक गायकवाड आदी उपस्थित होते.डॉ. मोरे म्हणाले की, अठरावे शतक हे पूर्णपणे मराठ्यांच्या कर्तबगारीचे होते. मात्र, याची दखल कोणीही घेतली नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर अठरापगड जाती असलेला मराठा समाज चवताळून निघाला होता. चोवीस तास लढाई करून मराठ्यांनी दक्षिण प्रांताबरोबरच उत्तरेकडील तख्तदेखील काबीज केले. या काळामध्ये मराठा समाजाची दहशत मुघलांमध्ये निर्माण झाली होती.’’ते म्हणाले, ‘व्यवसाय करण्यासाठी अनेक समाजातील नागरिक स्थलांतर करीत असतात. परंतु इतर राज्य काबीज करून चालविण्यासाठी जाणारे एकमेव मराठे होते. इंग्रजांनी भारतात पाय रोवण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांना सर्वाधिक धोका मराठ्यांकडून होता. त्यामुळे मराठे स्वकीयांची कशा प्रकारे पिळवणूक करीत आहे याचे चित्र मांडले. स्वत:च्या फायद्यासाठी इंग्रजांनी केलेल्या या कृत्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर मराठ्यांची बदनामी होत आहे. मराठे स्वकियांशी लढले अशी परिस्थिती दाखवीत असताना मराठे स्वकियांशी का लढले, याचे कारण मात्र अधांतरीत ठेवण्यात येते. सूत्रसंचालन सहदेव चव्हाण यांनी केले. आभार रूपाली गुलालकारी यांनी मानले.>शासनाची १२ लाखांची मदतइंग्रजानंतर भारतातील इतिहासकरांनी इतिहास लिहिला. परंतु समग्र मराठा इतिहास लिहिण्याऐवजी विशिष्ट जातीवर इतिहास लिहिले गेले. त्यामुळे समग्र मराठा इतिहास आजही लिहिला गेला नाही. महाराष्ट्राबाहेरील मराठा इतिहास लिहिण्यासाठी महाराष्ट्र शासनाने १२ लाखांची मदत केली असल्याचे सदानंद मोरे यांनी सांगितले. प्राचार्य नंदकुमार निकम म्हणाले की, पानिपतमध्ये मराठे हरले हे दाखविले जाते. परंतु मराठे कशा प्रकारे लढले, याची माहिती सांगितली जात नाही. मराठा उदात्तीकरण करण्यापेक्षा विश्लेषण करण्याची गरज आहे.‘कर्नाटकात मराठी साम्राज्याचा विस्तार’ या विषयावर श्रीकांत रणदिवे यांनी, तर ‘पानिपतची मोहीम’ या विषयावर पांडुरंग बलकवडे यांनी मार्गदर्शन केले. नामदेवराव ढाले यांनी शोधनिबंधाचे वाचन केले.