शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

काळजी वाटते कारण...

By admin | Updated: August 21, 2016 03:02 IST

सर्वोच्च न्यायालयाने थरांसाठी २० फुटांची मर्यादा घालून दिली आहे. शिवाय, १८ वर्षांखील गोविंदांना उत्सवात सहभागी होण्यासाठी निर्बंध घातले आहेत. २०१४ साली दहीहंडी उत्सवाविषयी

- स्वाती पाटील, याचिकाकर्त्यासर्वोच्च न्यायालयाने थरांसाठी २० फुटांची मर्यादा घालून दिली आहे. शिवाय, १८ वर्षांखील गोविंदांना उत्सवात सहभागी होण्यासाठी निर्बंध घातले आहेत. २०१४ साली दहीहंडी उत्सवाविषयी जनहित याचिका दाखल केली. या संघर्षाला दोन वर्षांनंतर काहीसे यश आले आहे. गोविंदांची काळजी वाटण्यामागे कारण आहे. देशाची लोकसंख्या जरी १२३ कोटी असली, तरी या देशाच्या तरुणाचा एक जीवदेखील अनमोल आहे. तो मला जेवढा अनमोल वाटतो, त्याच्या कित्येक पटीने तुमच्या आई-वडिलांना तो अनमोल आहे. तुमच्या जिवापेक्षा त्यांना अधिक काही नाही. ज्यांच्या सगळ््या आशा-अपेक्षा तुमच्यावर आहेत, ते आई-वडील, जीवनभराच्या साथीची अपेक्षा करणारी बायको आणि ज्यांना तुमचा हात धरून आपली चिमुकली पावले टाकायची आहेत, ते लहानगे यांना तुमची नितांत गरज आहे, हे लक्षात असू द्या.दहीहंडी उत्सवाच्या दिवशी आपण ७-८ थर ही लावता, परंतु त्या दिवशी आपल्या सुरक्षिततेसाठी कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसते. आपणच आपली स्वत:ची काळजी घेतो. थरांवर थर रचतो, पण थरातील दुसऱ्याच्या चुकीमुळे तिसऱ्यालाच जीव गमवावा लागतो किंवा गंभीर दुखापत होते. या उत्सवाचे बाजारीकरण करण्यामागे स्पर्धा आणि उत्सव स्पर्धा वाढविण्यास आयोजक कारणीभूत आहेत. ते आयोजक आपल्या सुरक्षेबाबत आजदेखील काही बोलत नाहीत किंवा पूर्ण जबाबदारी घेत नाहीत.वीस फुटांवर दहीहंडी बांधायची आहे, त्याने उत्सव समाप्त होत नाही. उत्सवावर बंदी येत नाही, हे सर्वांनाच माहीत आहे. मग आयोजक आपल्या चार ते पाच थरांच्या सलामीला का तयार होत नाहीत? त्यांना दहीहंडी रद्द करण्याचे कारणच काय? वीस फुटांवरील दहीहंडी फोडण्यासाठी आलेल्या गोविंदा पथकांचे तेवढ्याच भव्य-दिव्यपणे स्वागत केले जाईल. त्यांना योग्य मानधन दिले जाईल, अशी घोषणा एकही आयोजक का करीत नाही? अनेक लोकप्रतिनिधीच उत्सवाच्या व्यापारीकरणासाठी, स्वत:ला प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि आपली व्होटबँक भरण्यासाठी गोविंदांचा सर्रास वापर करतात. गोविंदांना एकच आवाहन आहे, कशाला न्यायालयाने सांगितले पाहिजे? आपण स्वत: विचार करा. आपला स्वत:चा, आपल्या मित्रांच्या कुटुंबांचा आणि आपल्या गोविंदा पथकांचा. कारण आपल्यातीलच एखादा गोविंदा अपंग झाला किंवा मृत्यू झाला, तर आपणही ते दु:ख अखेरपर्यंत विसरू शकत नाही, परंतु या निष्ठुर आयोजकांना या नेत्यांच्या हृदयाला मात्र पाझर फुटत नाही.