शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

वरळीत पोलिसाच्या अंगावर गाडी घातली

By admin | Updated: September 9, 2016 05:37 IST

पोलिसांशी सौजन्याने वागा, दादागिरी केल्यास जन्माची अद्दल घडवू, असा इशारा पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी दिल्यानंतरही खाकीवरील हल्ल्याचे सत्र सुरूच असून

मुंबई : पोलिसांशी सौजन्याने वागा, दादागिरी केल्यास जन्माची अद्दल घडवू, असा इशारा पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी दिल्यानंतरही खाकीवरील हल्ल्याचे सत्र सुरूच असून, गुरुवारी वरळीमध्ये एका अल्पवयीन दुचाकीस्वाराने पोलिसाच्या अंगावर गाडी घातली. पोलीस शिपाई दीपक निकाळजे (४५) हे यात गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर पोद्दार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी अल्पवयीन आरोपीसह त्याच्या आई-वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरळी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस शिपाई निकाळजे हे गुरुवारी त्यांच्या सहकाऱ्यांसह वरळी नाका येथे नाकाबंदीसाठी तैनात होते. याच मार्गावरून भरधाव वेगाने आलेल्या अल्पवयीन दुचाकी स्वाराला पोलीस उपनिरीक्षक शिर्के यांनी थांबवण्याचा इशारा केला. मात्र दुचाकीस्वार पळून जात असल्याचे निकाळजे यांच्या लक्षात आले. त्यांनी या दुचाकीस्वाराला अडविण्याचा प्रयत्न केला. पोलीस आपल्याला पकडण्यासाठी येत असल्याचे लक्षात येताच दुचाकीस्वाराने निकाळजे यांच्या अंगावर गाडी घातली. दुचाकीची जोरात धडक बसल्याने निकाळजे रस्त्याच्या कडेला फेकले गेले.नाकाबंदीसाठी असलेल्या अन्य सहकाऱ्यांनी दुचाकीस्वाराला ताब्यात घेत, जखमी अवस्थेतील निकाळजे यांना उपचारासाठी जवळच्या पोद्दार रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी गुन्हा दाखल करून १७ वर्षीय अल्पवयीन तरुणासह दुचाकीवर मागे बसलेल्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. तसेच अल्पवयीन असताना मुलाकडे दुचाकी चालविण्यास दिल्याने याप्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन दुचाकीस्वाराचे वडील हमीद वाघू आणि आई झुलेखा हमीद वाघू यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. वाघू कुटुंबीय वरळी परिसरात राहतात.