शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
4
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
5
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
6
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
7
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
8
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
9
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
10
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
11
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
12
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
13
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
14
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
15
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
16
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
17
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
18
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
19
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
20
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा

गिधाड संवर्धनाची दखल जागतिक स्तरावर

By admin | Updated: October 3, 2016 03:19 IST

सिस्केप या संस्थेच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून गिधाडांचे संवर्धन करण्यात येत आहे.

महाड : महाडच्या प्रेमसागर मेस्त्री या निसर्ग आणि ध्येयवेड्या तरुणाच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या सिस्केप या संस्थेच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून गिधाडांचे संवर्धन करण्यात येत आहे. सिस्केपच्या कामाची दखल जागतिक स्तरावरील निसर्गप्रेमींनी घेतली आहे. संस्थेने महाडचे नाव जगाच्या नकाशावर कोरले याचा आपल्याला सार्थ अभिमान असून या संस्थेच्या कामाची दखल केंद्र व राज्य सरकारने घ्यावी, अशी अपेक्षा महाडचे माजी आमदार माणिक जगताप यांनी व्यक्त केली.सिस्केप संस्थेतर्फे १ ते ७ आॅक्टोबर दरम्यान जागतिक वन्यजीव सप्ताहानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित केलेल्या वन्यजीव छायाचित्रांच्या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष महमद अली पल्लवकर, सिस्केपचे अध्यक्ष प्रेमसागर मेस्त्री, वनक्षेत्रपाल मच्छिंद्र देवरे, युवा नेते हनुमंत जगताप, रंगसुगंधचे अध्यक्ष सुधीर शेठ, आदि उपस्थित होते. यावेळी माणिक जगताप यांनी सिस्केप या संस्थेला वैयक्तिक पंचवीस हजार रुपयांची देणगी जाहीर केली.जगताप म्हणाले, की सिस्केपने सुरू केलेल्या चिरगाव येथील गिधाड संवर्धन केंद्राला ३४ देशातील प्राणिमित्र भेट देवून सिस्केपचे कौतुक केले आहे. मात्र या संस्थेला शासन कुठलेही सहकार्य करीत नाही, याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली. सिस्के पला शासनाने सहकार्य करावे, यासाठी आपण स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून यासाठी शासनाच्या वनविभागाला आर्थिक तरतूद करण्याची विनंती करणार असल्याचेही जगताप यांनी सांगितले. संस्थेला महाड नगरपरिषदेकडून दरवर्षी अनुदान देण्याच्या सूचना नगराध्यक्षांना त्यांनी यावेळी दिल्या. प्रेमसागर मेस्त्री यांनी सिस्केपच्या कामाचा आढावा घेताना अत्यंत प्रतिकूल आव्हानांना सामोरे जात संस्थेला पर्यावरणाचे संवर्धनासाठी धडपड करावी लागत असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन पक्षी संवर्धनासाठी काम करण्याचा सल्ला त्यांनी दिला. >फणसाड अभयारण्यात वन्यजीव सप्ताह आगरदांडा : मुरूड तालुक्यातील फणसाड अभयारण्यात ७ आॅक्टोबरपर्यंत वन्यजीव सप्ताहाचे साजरा करण्यात आले आहे. या निमित्ताने फणसाड वन्यजीव व प्रशासनातर्फेप्रचार व प्रसिद्धी व्हावी या अनुषंगाने जनजागृती कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्र माचे उद्घाटन व अध्यक्ष अ‍ॅड. संजय जोशी यांच्या हस्ते झाले. सप्ताह आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरा केला जात असून संपूर्ण वन्यजीव या विषयावर माहिती देण्यात येईल. यासाठी क्षेत्रीय कर्मचारी परिसरातील शाळांमधून फणसाड अभयारण्याची अधिकाधिक माहिती विद्यार्थ्यांना अवगत व्हावी यासाठी निसर्ग सहल आयोजित केली होती.