शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक युवा कौशल्य दिन

By admin | Updated: July 15, 2016 20:28 IST

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने नोव्हेंबर २०१४ मध्ये १५ जुलै हा दिवस जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून घोषित केला.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 15 - संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने नोव्हेंबर २०१४ मध्ये १५ जुलै हा दिवस जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून घोषित केला. त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ साली कौशल्य भारत (स्किल इंडिया)योजनेची घोषणा केली. मात्र अर्थसहाय्याविना कौशल्याचा विकास करायचा तरी कसा? असा सवाल अशासकीय आयटीआयमधील विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. मुद्रा बँकेमार्फत केंद्र शासनाने राज्यातील आयटीआय उत्तीर्ण प्रशिक्षणार्थींना कर्ज पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. त्यात अनुभवी प्रशिक्षणार्थींना १० लाख रुपयांपर्यंत, तर नवोदित प्रशिक्षणार्थींना ५ लाख रुपयांपर्यंतचा कर्ज पुरवठा करण्याचे निश्चित झाले. मात्र केंद्र शासनाकडे राज्यातून या कर्जपुरवठ्यासाठी केवळ शासकीय आयटीआयची यादी देण्यात आली. परिणामी अशासकीय आयटीआयमधील प्रशिक्षणार्थी या योजनेपासून वंचित राहिले आहेत.राज्यात कौशल्य विकास साधण्याचे काम आयटीआयमार्फत सुरू आहे. गेल्या काही वर्षांत तंत्रनिकेतन शाखांकडे पाठ फिरवलेले विद्यार्थी मोठ्या संख्येने आयटीआयकडे आकर्षित होत आहेत. त्यामुळे यंदा आयटीआयमधील सुमारे ७७ ट्रेडसाठी सुमारे ३ लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. राज्यात ३९८ शासकीय, तर ४५४ अशासकीय आयटीआय आहेत. त्यांमधून यावर्षी सुमारे ९० हजार प्रशिक्षणार्थी प्रमाणपत्र घेऊन आयटीआय बाहेर पडतील. त्यांतील शासकीय आयटीआयमधून उत्तीर्ण होणाऱ्या ५० ते ५५ हजार प्रशिक्षणार्थींना बँकेमधून कर्ज पुरवठा झाल्याने स्वत:चा व्यवसाय सुरू करता येईल. मात्र उरलेल्या सुमारे ३८ ते ४० हजार प्रशिक्षणार्थ्यांना अशासकीय आयटीआयमधून उत्तीर्ण झाल्याने कर्ज पुरवठ्याची व्यवस्था उपलब्ध नाही. त्यामुळे तुटपूंज्यापगारावर नोकरी करण्याशिवाय त्यांच्यासमोर पर्याय नसेल. एकंदरीतच कुशलता असतानाही, केवळ अर्थसहाय्याविना प्रशिक्षणार्थींना व्यवसायापासून वंचित राहावे लागणार आहे, असा आरोप अशासकीय आयटीआय प्राचार्य, कर्मचारीसंघटनेचे अध्यक्ष संजय बोरस्ते यांनी केला आहे.बोरस्ते यांनी सांगितले की, मुळात सर्व प्रशिक्षणार्थींना डोळ््यासमोरठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेची सुरूवात केली होती. मात्रराज्य शासनातील काही अधिकाऱ्यांनी येथील अशासकीय आयटीआयची यादीचकेंद्राकडे पाठवली नाही. त्यामुळे केवळ शासकीय आयटीआयची यादी राज्यातीलबँकाकडे धाडण्यात आली. परिणामी आपोआपच अशासकीय आयटीआयमधीलप्रशिक्षणार्थीही योनजेतून वगळले गेले. त्याचा फटका यावर्षी हजारोप्रशिक्षणार्थींना बसणार आहे......................समतोल राहणार कसा?शासकीय आयटीआयमधील विद्यार्थ्यांना प्रवेशापासून आयटीआयमधील ट्रेडपरीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मिळणाऱ्या कर्जापर्यंत विविध सवलती देण्यातआल्या आहेत. याउलट राज्यातील अशासकीय आयटीआयमधील प्रशिक्षणार्थ्यांनाप्रवेश शुल्कापासून उत्तीर्ण झाल्यानंतरही कोणतीच सवलत मिळत नाही.परिणामी एकाच प्रकारचे प्रशिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या दोन गटांत समतोलसाधणार कसा? असा सवाल उपस्थित होतो. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचा विचारकरून शासनाने या धोरणाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.......................