शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

अभिधा निफाडे ठरली जागतिक युवा राजदूत

By admin | Updated: August 3, 2016 00:49 IST

सातत्याने कार्यरत असणाऱ्या अभिधा निफाडे हिची जागतिक युवा राजदूत म्हणून निवड करण्यात आली आहे.

पुणे : समाजातील प्रत्येक घटकाला कायदेविषयक ज्ञान मिळावे, यादृष्टीने सातत्याने कार्यरत असणाऱ्या अभिधा निफाडे हिची जागतिक युवा राजदूत म्हणून निवड करण्यात आली आहे. ‘बीर्इंग लॉजिकल’ या संस्थेच्या माध्यमातून ती कायदा या विषयाबाबत सर्वसामान्यांमध्ये जागृती निर्माण करणाऱ्या अभिधाच्या सामाजिक कार्याची संयुक्त राष्ट्रसंघाने दखल घेत तिची नियुक्ती केली.अभिधा आयएलएस लॉ कॉलेजच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे. ती मूळची अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर या गावची रहिवासी. तिचे आई-वडील दोघेही श्रीरामपूर येथे प्राध्यापक म्हणून काम करतात. नगर जिल्ह्यात सातत्याने घडणाऱ्या महिलांवरील अत्याचाराच्या घटनांनी ती अस्वस्थ झाली. स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना, कारणमीमांसा आदी बाबींचा अभिधाने बारकाईने अभ्यास केला. अभ्यासादरम्यान, महिला आणि शोषितांना कायद्याचे ज्ञान आणि अचूक माहिती नसते, हे तिच्या लक्षात आले. कायद्याविषयी समाजात असलेल्या निरक्षरतेमुळे तिला ‘बीर्इंग लॉजिकल’ या संस्थेची स्थापना करण्याची प्रेरणा मिळाली.अभिधा म्हणते, ‘माझ्या सामाजिक कार्याची सुरुवात पुण्यातील रोशनी या स्वयंसेवी संस्थेबरोबर झाली. महिलांसाठी बचतगट, लहान मुलांसाठी चाइल्ड अ‍ॅक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग सेंटर प्रकल्प, तसेच चेन्नई सहायता कॅम्पेन इत्यादी प्रकल्पात मी काम केले आहे. काही काळासाठी मला दलाई लामा फाउंडेशनसह काम करण्याची संधी मिळाली. त्यातूनच गरजूंपर्यंत पोहोचण्याची प्रेरणा मला मिळाली.’जागतिक युवा राजदूत म्हणून काम करत असताना महानगरपालिका शाळांमधील शिक्षणपद्धती जास्तीत जास्त विद्यार्थीभिमुख कशी बनेल, तसेच समाजात कायद्याविषयी जाणीव निर्माण होईल, यादृष्टीने काम करण्याचा अभिधाचा मानस आहे. जास्तीत जास्त मुलींना शिक्षण मिळावे, यासाठी ती प्रयत्नशील राहणार आहे. १ जुलैै २०१६ ते ३१ जून २०१९ या काळात अभिधा निफाडे जागतिक युवा राजदूत म्हणून काम पाहणार आहे. (प्रतिनिधी)