शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

मोडून पडला संसार, तरी मोडला नाही कणा

By admin | Updated: August 30, 2014 01:57 IST

आंबेगाव तालुक्याच्या दुर्गम आदिवासी भागात डोंगराच्या कुशीत वसलेल्या माळीण गावावर डोंगराचा काही भाग कोसळून १५१ जण गाडले गेलेल्या घटनेला एक महिना पूर्ण होत आहे.

घोडेगाव : आंबेगाव तालुक्याच्या दुर्गम आदिवासी भागात डोंगराच्या कुशीत वसलेल्या माळीण गावावर डोंगराचा काही भाग कोसळून १५१ जण गाडले गेलेल्या घटनेला एक महिना पूर्ण होत आहे. एक महिना होऊनही माळीण गावातील सुदैवाने बचावलेले लोक व त्यांचे नातेवाईक दु:खातून सावरलेले नाहीत. तात्पुरती घरे बांधण्याचे काम सुरू असून, सध्या हे लोक आसाणे आश्रमशाळेत आश्रयाला आहेत. माळीण ग्रामस्थांचे अडिवरे गावाजवळ कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याचा निर्णय घोडेगाव येथे झालेल्या बैठकीत झाला आहे. मात्र, पुनर्वसनाबाबत त्यांच्यात एकमत नाही. बाहेरगावी राहणारे माळीणचे लोक डिंभे, घोडेगाव अशा सधन भागात पुनर्वसन करून मागत आहेत; तर माळीणमध्ये राहणारे लोक येथेच जवळपास पुनर्वसन व्हावे, अशी मागणी करत आहेत. शासनाने अडिवरे गावाजवळ जागा निश्चित केली असली, तरी या जागेलाही सगळ्यांची पसंती नाही. तसेच, १५ तरुणांना नोकरीची गरज आहे. त्यांना शासनाने नोकरीत घ्यावे, अशी मागणीदेखील माळीण ग्रामस्थ करत आहेत. माळीण फाट्यावर असलेल्या शाळेच्या पटांगणात तात्पुरती पत्र्यांची ३० घरे बांधण्याचे काम सुरू असून, दि. १० सप्टेंबरपर्यंत ही घरे ताब्यात दिली जाणार आहेत. अडिवरे गावाजवळ भैरवनाथ मंदिराच्या परिसरात असलेल्या मोकळ्या जागेत कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याबाबत घोडेगाव येथील बैठकीत निर्णय झाला आहे. या निर्णयाला बैठकीत सर्वांनी मान्यता दिली. मात्र, सध्या या जागेला देखील विरोध होऊ लागला आहे. प्रत्येक मृत व्यक्तीमागे दहा ते अकरा लाख रुपये मिळणार आहेत. आर्थिक मदतीबरोबरच सर्व योजनांचा फायदाही माळीण ग्रामस्थांना देण्यात आला आहे. मृतांच्या वारसांची नोंद झाली असून, या मदतकार्यास सुरुवात झाली आहे. घटनास्थळी माळीणमध्ये कोणीही राहत नाही; मात्र माळीण पाहायला येणाऱ्यांची संख्या भरपूर आहे. (वार्ताहर)