शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अपहृत २३० विद्यार्थिनींच्या सुटकेसाठी जग एकवटले!

By admin | Updated: May 8, 2014 23:06 IST

दहशतवाद्यांनी ओलीस ठेवलेल्या २००हून अधिक विद्यार्थिनींची सुरक्षित सुटका व्हावी म्हणून जगभरातून नायजेरियन सरकारवर दबाव वाढत आहे.

युनोही प्रयत्नशील : नायजेरियातील बोको हरम दहशतवाद्यांची अमानुषता; मुलींना बाजारात विकण्याची धमकी

संयुक्त राष्ट्र : दहशतवाद्यांनी ओलीस ठेवलेल्या २००हून अधिक विद्यार्थिनींची सुरक्षित सुटका व्हावी म्हणून जगभरातून नायजेरियन सरकारवर दबाव वाढत आहे. तीन आठवड्यांपासून शोध लागत नसल्याने अमेरिका, चीन, ब्रिटन आणि फ्रान्स या जागतिक महासत्ता आता शोधमोहिमेत सहभागी झाल्या आहेत. नायजेरियाच्या ईशान्य भागातून बोको हरमच्या दहशतवाद्यांनी २३० विद्यार्र्थिनींचे शाळेतून अपहरण केले होते. अपहरण करण्यात आलेल्या मुली १५ ते १८ वयोगटातील आहेत. बोको हरमने गेल्या १४ एप्रिल रोजी बंदुकीच्या धाकावर या मुलींचे चिबोका शहरातील एका शाळेतून अपहरण केले होते. बोको हरमच्या प्रमुखाने मुलींना बाजारात विकण्याची आणि त्यांचे लग्न लावण्याची धमकी दिली आहे. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार गुलामगिरी व देहव्यापारास प्रवृत्त करणे निषिद्ध आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेने या घटनेचा निषेध केला असून मुलींची तात्काळ सुटका करण्याचे आवाहन केले आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेचे माजी सरचिटणीस कोफी अन्नान यांनीही अपहृत मुलींच्या सुटकेसाठी कारवाईची मागणी केली आहे. अपहरण करण्यात आलेल्या मुलींच्या सुटकेसाठी नायजेरियन सरकार व आफ्रिकी देशांनी ठोस प्रयत्न केले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. जगभरातून नायजेरियन सरकारवर दबाव वाढत असतानाच अमेरिका व फ्रान्सने शोधमोहिमेच्या मदतीसाठी विशेषज्ञांचे एक पथक पाठवले आहे. दुसरीकडे ब्रिटन उपग्रह छायाचित्रे काढण्याची क्षमता असलेली उपकरणे शोधमोहिमेच्या मदतीसाठी तैनात करणार आहे. नायजेरियन राष्ट्राध्यक्ष गुडलक जोनाथन यांचे प्रशासन गेल्या काही दिवसांपासून मुलींच्या सुटकेसाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. गेल्या पाचएक वर्षांत बोको हरम या दहशतवादी संघटनेने केलेल्या विविध हल्ल्यांत हजारोंचा जीव गेला आहे. (वृत्तसंस्था)

पारितोषिकाची घोषणा

नायजेरियन पोलिसांनी अपहृत विद्यार्थिनींच्या सुटकेच्या उद्देशाने योग्य माहिती देणार्‍यास तीन लाख डॉलर अर्थात एक कोटी ८० लाख रुपयांचे पारितोषिक देण्याची घोषणा केली आहे. ४सोमवारी बोर्नो राज्यात आणखी एक हल्ला केल्याचा आरोप बोको हरमवर होत आहे. या हल्ल्यात जवळपास तीनशे जण मारले गेल्याची भीती व्यक्त होत आहे. याशिवाय रविवारी एका गावातून आणखी आठ मुलींचे अपहरण केले गेले होते.

मिशेल ओबामांचाही सहभाग

मिशेल ओबामा यांनी या अपहरणाविरोधात सोशल मीडियावर सुरू करण्यात आलेल्या मोहिमेत सहभाग घेतला आहे. आमच्या मुली परत आणा, असा संदेश असलेला फलक घेऊन मिशेल यांनी फोटो काढला आहे. ४अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी या घटनेबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली असून नायजेरियन शोधमोहिमेच्या मदतीसाठी सैन्य तज्ज्ञांचे पथक पाठविले आहे.

गप्प बसू नका -मलाला

विद्यार्र्थिनींच्या अपहरणावर जगाने गप्प न बसता त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन पाकिस्तानात मुलींच्या शिक्षणाधिकारासाठी लढणार्‍या मलाला युसूफजाईने केले आहे. आम्ही गप्प राहिलो, तर अशा घटनांमध्ये वाढ होईल, असे मलाला म्हणाली. ४तालिबान्यांच्या हल्ल्यातून बचावलेली मलाला सध्या ब्रिटनमध्ये वास्तव्य करत आहे. आता ती जगभरातील मुलींच्या शिक्षणासाठी अभियान चालवत आहे. मलालावर २०१२ मध्ये हल्ला झाला होता. ब्रिटनमध्ये अनेक महिने औषधोपचार केल्यानंतर तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली.