मुंबई : गेल्या अडीच हजार वर्षांत कोणत्याही साधू किंवा साध्वीजींना न जमलेले ‘गुणरत्न संवत्सर तप’ रविवारी पूर्णत्वाला पोहोचणार आहे. श्री हंसरत्न विजयजी महाराज हे तप पूर्ण करणार असून हा ‘पारणा’ महोत्सव १ नोव्हेंबरला सकाळी आठ वाजता वांद्रे-कुर्ला संकुल येथील एमएमआरडीए मैदानात पार पडणार आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची या महोत्सवात प्रमुख उपस्थिती असेल. या जागतिक विक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी हजारो अनुयायी उपस्थित राहण्याची शक्यता आयोजकांनी व्यक्त केली आहे. भगवान महावीर यांच्या काळात पाच जैन साधू महाराजांनी हा उपवास यशस्वीरीत्या पूर्ण केला होता. त्यानंतर अडीच हजार वर्षांनंतर ही कठीण तपस्या पूर्णत्वास येत असल्याचा दावा गुणरत्न संवत्सर तप पारणा महोत्सव कमिटीने केला आहे.या तपात तपस्या करणाऱ्या व्यक्तीला उपवासाच्या दिवशी सकाळी १० ते सायंकाळी सहा वाजेदरम्यान केवळ गरम पाणी पिण्याची मुभा असते. तर सायंकाळी सहा ते सकाळी १० वाजेपर्यंत पाणीही पिता येत नाही. कोणताही प्रवास अनवाणीच करावा लागतो. त्यासाठी प्रचंड इच्छाशक्तीसह शरीरावर, मनावर आणि आत्म्यावर नियंत्रण लागते.
श्री हंसरत्न विजयजी महाराज यांचा जागतिक विक्रम
By admin | Updated: October 31, 2015 01:33 IST