शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

विश्व साहित्य संमेलन होणार दक्षिण आफ्रिकेत?

By admin | Updated: June 27, 2014 00:29 IST

विश्व साहित्य संमेलनाबाबत घटनाबाह्यतेच्या मुद्यावर रण माजले. विरोध झाला आणि महामंडळाला टीकाही सहन करावी लागली. पण एखादे संमेलन यशस्वी करण्याची जिद्द कशी असावी, याचा आदर्श सध्या साहित्य महामंडळाने

अ. भा. मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादेत : अधिकृत निर्णय होणार १ जुलै रोजीराजेश पाणूरकर - नागपूरविश्व साहित्य संमेलनाबाबत घटनाबाह्यतेच्या मुद्यावर रण माजले. विरोध झाला आणि महामंडळाला टीकाही सहन करावी लागली. पण एखादे संमेलन यशस्वी करण्याची जिद्द कशी असावी, याचा आदर्श सध्या साहित्य महामंडळाने घातला आहे. घटनात्मक पेच असला आणि अद्याप घटना मंजूर होऊन आलेली नसली तरी यंदाचे चौथे विश्व मराठी साहित्य संमेलन दक्षिण आफ्रि केत आयोजित होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. आता केवळ औपचारिक घोषणाच शिल्लक आहे. पहिल्या विश्व साहित्य संमेलनापासून हे संमेलन सतत वादात अडकले आहे. घटनादुरुस्ती झाल्याशिवाय महामंडळाने विश्व साहित्य संमेलनाच्या आयोजनात पडणे योग्य ठरणार नाही, असा एक विचार बोलला जातो आहे. पण अद्याप घटनादुरुस्ती मंजूर झालेली नसतानाही साहित्यिकांना आफ्रिकन सफारीचा आनंद देण्याची योजना महामंडळाने तयार केली. याबाबत साहित्यक्षेत्रातच उलटसुलट चर्चांना पेव फुटले आहे. टोरॅन्टोच्या विश्व साहित्य संमेलनाच्यावेळी टोरॅन्टोवासीयांनी साहित्यिकांचा खर्च नाकारला. त्यात हे संमेलनच घटनाबाह्य असल्याचे कारण सांगून मुख्यमंत्र्यांनी शासनाचा २५ लाख रुपयांचा निधी महामंडळाला परत मागितला. महामंडळाने तो परतही दिला.विश्व मराठी संमेलनाला अडचण नाहीविश्व मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनात यंदा कुठलीच अडचण नाही. घटनादुरुस्ती झालेली आहे. घटनादुरुस्ती केल्यावर सहा महिन्यांच्या कालावधीत त्यावर कुणाचाही आक्षेप नसेल तर घटना मान्य असल्याचे समजण्यात येते. त्याप्रमाणे ही घटना मान्य केली गेली आहे. त्यामुळे विश्व मराठी साहित्य संमेलनासाठी कुठलीही अडचण येणार नाही आणि शासनाचाही निधी प्राप्त होईल. याबाबत महामंडळाने संपूर्ण तयारी केली आहे. - शुभदा फडणवीस, अ. भा. मराठी साहित्य महामंडळ, सदस्य