शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

जगप्रसिद्ध कार्निव्हलला गोव्यात आरंभ, देश-विदेशी पर्यटकांची गर्दी

By admin | Updated: February 25, 2017 19:31 IST

खा, प्या व मजा करा असा संदेश देणाऱ्या किंग मोमोची चार दिवसांची राजवट शनिवारी पणजीतील कार्निव्हल मिरवणुकीने गोव्यात सुरू झाली

सदगुरू पाटील / ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 25 - खा, प्या व मजा करा असा संदेश देणाऱ्या किंग मोमोची चार दिवसांची राजवट शनिवारी पणजीतील कार्निव्हल मिरवणुकीने गोव्यात सुरू झाली. मांडवी नदीच्या किनारी जमून देश-विदेशातील हजारो पर्यटक ह्या मिरवणुकीचे साक्षीदार बनले.
एकूण 56 चित्ररथ पणजीतील कार्निव्हल मिरवणुकीत सहभागी झाले. गोवा पर्यटन विकास महामंडळाने विजेत्यांसाठी सहा लाख रुपयांची बक्षीसे पुरस्कृत केली आहेत. सायंकाळी पणजीतील दिवजा सर्कलकडून कार्निव्हल मिरवणुकीस आरंभ झाला. मुख्य सचिव धर्मेश शर्मा यांनी हिरवा बावटा दाखविला. यावेळी निवडणुकीच्या आचारसंहिता काळात कार्निव्हल होत आहे.
 
गेले अनेक दिवस पणजी शहर विविध अंगांनी सजून कार्निव्हलची प्रतीक्षा करत होते. शनिवारी संगीताच्या तालावर शहरातून निघालेल्या  कार्निव्हल मिरवणुकीचा गोमंतकीयांसह देश--विदेशी पर्यटकांनीही आनंद घेतला.
हातात असलेल्या बिअरच्या बाटल्या तोंडाला लावून रस्त्याच्या कडेने गर्दी करून शेकडो विदेशी युवा युवती पर्यटक कार्निव्हलचा आनंद लुटत असल्याचे पहायला मिळाले. अनेकांनी एकमेकांना रंग लावून व पिचकाऱ्याही मारून कार्निव्हलचा फिव्हर वाढवला.
गोव्यातील निसर्ग, शेती, पर्यावरण सांभाळून ठेवायला हवे असा संदेश मिरवणुकीतील काही चित्ररथांनी दिला. काहीजणांनी चित्ररथांमधून गोमंतकीयांच्या श्रम संस्कृतीचा व गोंयकारपणाचा व एकूणच गोमंतकीय अस्मितेचा  गौरव केला. गोव्यातील लोककला, लोकसंगीत याचे दर्शन घडविणारे तसेच गोव्याच्या कृषी संस्कृतीसह धार्मिक एकोप्याचे महत्त्व अधोरेखित करणारेही आकर्षक व प्रभावी चित्ररथ पहायला मिळाले. डिजीटल व  इंटरनेटचा प्रसार करणारा चित्ररथही मिरवणुकीत सहभागी झाला.
विव्हा कार्निव्हल असे म्हणत पणजीवासियांनी व पर्यटकांनीही कार्निव्हलचे आनंदात स्वागत केले. कला अकादमीपर्यंत मिरवणूक गेली. लोकांनी आपल्या सदनिकांच्या गच्चीत राहूनही मिरवणुकीतील दृश्यांचा आनंद घेतला.