शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

‘वर्ल्ड क्लास युनिव्हर्सिटी’ची प्रक्रिया लवकरच - जावडेकर

By admin | Updated: April 10, 2017 04:44 IST

देशात २० ‘वर्ल्ड क्लास युनिव्हर्सिटी’ उभ्या केल्या जाणार असून केंद्र शासनाकडून लवकरच

पुणे : देशात २० ‘वर्ल्ड क्लास युनिव्हर्सिटी’ उभ्या केल्या जाणार असून केंद्र शासनाकडून लवकरच आॅनलाइन अर्ज मागविले जातील. पण जागतिक दर्जाचे विद्यापीठ बनविण्यास किमान २० वर्षे प्रयत्न करावे लागतील, असे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी येथे सांगितले.सिंबायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी व असोसिएशन आॅफ इंडियन युनिव्हर्सिटीतर्फे (एआययू) आयोजित ‘उच्च शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयकरणाचे बदलते स्वरूप’ या विषयावरील दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे जावडेकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. सिंबायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार, विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष प्रा. वेदप्रकाश आदी उपस्थित होते.जावडेकर म्हणाले, आपल्याकडे उत्तम शिक्षकांचा तुटवडा असून केंद्रीय विद्यापीठ आणि आयआयटीसारख्या संस्थांमध्ये सुमारे ४० टक्के प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. देशात ४० विद्यार्थ्यांना पीएच.डी.साठी एकच मार्गदर्शक, असे चित्र आहे. ही स्थिती बदलण्यासाठी परदेशात संशोधन करण्यासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना शिक्षक म्हणून परत आणण्याची मोहीम सुरू केली आहे. नॅशनल डिजिटल लायब्ररीमुळे लाखो पुस्तके एका क्लिकवर उपलब्ध होणार आहेत. हॅकेथॉन स्पर्धेलाही मोठा प्रतिसाद मिळत असून विद्यार्थ्यांनी केंद्रीय मंत्रालयांना भेडसावणारे अनेक प्रश्न सोडवले आहेत. अधिकाधिक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळण्यासाठी हायर एज्युकेशन फायनान्सिंग एजन्सी स्थापन केली असून त्याद्वारे २० हजार कोटी रुपये उभारण्यात येतील. देशातील विद्यापीठांमधील परदेशी विद्यार्थ्यांची संख्या खूप कमी असून त्यात वाढ करण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)रँकिंग प्रक्रियेत बदल नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्कतर्फे (एनआयआरएफ) पुढील वर्षापासून विद्यापीठ व महाविद्यालयांना देण्यात येणाऱ्या रँकिंगच्या प्रक्रियेत बदल केले केले जातील, असे जावडेकर यांनी सांगितले.