शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
6
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
7
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
8
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
9
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
10
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
11
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
12
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
13
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
14
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
15
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
16
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
17
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
18
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
19
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
20
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!

अंधांच्या संकेतस्थळाचे जग आज खुले होणार

By admin | Updated: January 19, 2015 01:00 IST

चार देशांत एकाचवेळी उद्घाटन : दृष्टिहीनांच्या कम्युनिटी रेडिओचे पहिले पाऊल

चंद्रकांत कित्तुरे/ कोल्हापूर : अंधांसाठी बे्रलवाणी एज्युकेशन रेडिओ केंद्र सुरू करण्यासाठीचे पहिले पाऊल उद्या, सोमवारी संकेतस्थळाद्वारे (वेबसाईट) पडते आहे. भारत, अमेरिका, दक्षिण आफ्रिका आणि आॅस्ट्रेलियात एकाचवेळी ६६६.स्रांु.्रल्लया संकेतस्थळाचे उद्घाटन केले जाणार आहे. या माध्यमातून अंधासाठी एक नवे जग खुले होणार आहे. अंध शिक्षण संशोधक सतीश नवले यांच्या ध्यासातून आणि पुण्यातील प्रेरणा असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संस्थेच्या पुढाकाराने या संकेतस्थळाची निर्मिती केली आहे.सतीश नवले हे मुळचे पुणे जिल्ह्यातील तळेगाव ढमढेरेचे. मात्र, सध्या कोल्हापुरात राहात आहेत. मात्र, आपल्या अंधत्वावर मात करत सतीश यांनी कम्युनिटी रेडिओ चालविणारा देशातील पहिला अंध ठरण्याचा बहुमान मिळविला आहे. सांगली जिल्ह्यातील येरळावाणी कम्युनिटी रेडिओ या केंद्राचे इन्चार्ज म्हणून त्यांनी सुमारे दीड वर्षे काम केले आहे. यातूनच अंधांसाठी अंधांचे एक स्वतंत्र कम्युनिटी रेडिओ केंद्र सुरू करण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. पुण्यातील ‘प्रेरणा’ या अंधांसाठी काम करणाऱ्या संस्थेचे आणि तिचे अध्यक्ष अरविंद कणेरे यांचे त्याला पाठबळ आहे. त्याच्या जोरावरच हे संकेतस्थळ आज सुरू होत आहे.याबाबत माहिती देताना ते म्हणाले की, कोल्हापुरातील डॉ. डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये, पुण्यातील मॉडर्न हायस्कूल इंग्लिश मेडियम या शाळेत ले. जन. डी. बी. शेकटकर यांच्या हस्ते आणि नांदेड विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांच्या उपस्थितीत, दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गमध्ये मुळचे कोल्हापूरचे असलेले सुजय कुलकर्णी यांच्या, तर अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी येथे अविरत कणेरे यांच्या उपस्थितीत सकाळी १० वाजता या संकेतस्थळाचे एकाचवेळी उद्घाटन केले जाणार आहे.हे संकेतस्थळ डॉ. डी. वाय. पाटील. इंजिनिअरिंग कॉलेजच्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी तयार केले आहे. त्याला कोल्हापुरातील मनोरमा इन्फोटेकचे तांत्रिक सहकार्य लाभले असल्याचेही त्यांनी सांगितले. अंधांसाठी जनजागृती अभियान, समाजात नेत्रदानाचा प्रसार करणे, अंधांसाठी सॉफ्टवेअर तयार करणे, अंधांसाठी आॅनलाईन शिक्षण देणे हे उद्देश हे संकेतस्थळ सुरू करण्यामागचे आहेत. कम्युनिटी रेडिओ केंद्रासाठीचे हे पहिले पाऊल आहे. रेडिओ केंद्र येत्या एप्रिलमध्ये सुरू करण्याचा मानस असल्याचेही नवले यांनी सांगितले.