शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
2
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
3
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
4
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
5
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
6
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
7
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
8
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम
9
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू
10
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
11
Mobile Ban School: शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी; दक्षिण कोरियाने का घेतला निर्णय?
12
Rishi Panchami 2025: ऋषींनी आपल्यासाठी काय केले? हे जाणून घेण्यासाठी 'हा' एक श्लोक पुरेसा आहे!
13
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
14
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
15
"यावर्षी तुमच्याशिवाय घर अपूर्ण वाटतंय...", बाप्पाला घरी न आणल्यामुळे भावुक झाली शिल्पा शेट्टी
16
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
17
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
18
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
19
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
20
Crime: विधवा वहिनीच्या बेडरूममध्ये घुसून दीराचं घाणेरडं कृत्य, गुन्हा दाखल!

अंधांच्या संकेतस्थळाचे जग आज खुले!

By admin | Updated: January 18, 2015 22:55 IST

चार देशांत एकाचवेळी उद्घाटन : दृष्टिहीनांच्या कम्युनिटी रेडिओचे पहिले पाऊल

चंद्रकांत कित्तुरे - कोल्हापूर -अंधांसाठी बे्रलवाणी एज्युकेशन रेडिओ केंद्र सुरू करण्यासाठीचे पहिले पाऊल उद्या, सोमवारी संकेतस्थळाद्वारे (वेबसाईट) पडते आहे. भारत, अमेरिका, दक्षिण आफ्रिका आणि आॅस्ट्रेलियात एकाचवेळी ६६६.स्रांु.्रल्ल या संकेतस्थळाचे उद्घाटन केले जाणार आहे. या माध्यमातून अंधासाठी एक नवे जग खुले होणार आहे. अंध शिक्षण संशोधक सतीश नवले यांच्या ध्यासातून आणि पुण्यातील प्रेरणा असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संस्थेच्या पुढाकाराने या संकेतस्थळाची निर्मिती केली आहे.सतीश नवले हे मुळचे पुणे जिल्ह्यातील तळेगाव ढमढेरेचे. मात्र, सध्या कोल्हापुरात राहात आहेत. मात्र, आपल्या अंधत्वावर मात करत सतीश यांनी कम्युनिटी रेडिओ चालविणारा देशातील पहिला अंध ठरण्याचा बहुमान मिळविला आहे. सांगली जिल्ह्यातील येरळावाणी कम्युनिटी रेडिओ या केंद्राचे इन्चार्ज म्हणून त्यांनी सुमारे दीड वर्षे काम केले आहे. यातूनच अंधांसाठी अंधांचे एक स्वतंत्र कम्युनिटी रेडिओ केंद्र सुरू करण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. पुण्यातील ‘प्रेरणा’ या अंधांसाठी काम करणाऱ्या संस्थेचे आणि तिचे अध्यक्ष अरविंद कणेरे यांचे त्याला पाठबळ आहे. त्याच्या जोरावरच हे संकेतस्थळ आज सुरू होत आहे.याबाबत माहिती देताना नवले म्हणाले की, कोल्हापुरातील डॉ. डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये, पुण्यातील मॉडर्न हायस्कूल इंग्लिश मेडियम या शाळेत ले. जन. डी. बी. शेकटकर यांच्या हस्ते आणि नांदेड विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांच्या उपस्थितीत. दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गमध्ये मुळचे कोल्हापूरचे असलेले सुजय कुलकर्णी यांच्या हस्ते, तर अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी येथे अविरत कणेरे यांच्या उपस्थितीत सकाळी १० वाजता या संकेतस्थळाचे एकाचवेळी उद्घाटन केले जाणार आहे.हे संकेतस्थळ डॉ. डी. वाय. पाटील. इंजिनिअरिंग कॉलेजच्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी तयार केले आहे. त्याला कोल्हापुरातील मनोरमा इन्फोटेकचे तांत्रिक सहकार्य लाभले असल्याचेही नवले यांनी सांगितले. अंधांसाठी जनजागृती अभियान, समाजात नेत्रदानाचा प्रसार करणे, अंधांसाठी सॉफ्टवेअर तयार करणे, अंधांसाठी आॅनलाईन शिक्षण देणे हे उद्देश हे संकेतस्थळ सुरू करण्यामागचे आहेत. कम्युनिटी रेडिओ केंद्रासाठीचे हे पहिले पाऊल आहे. रेडिओ केंद्र येत्या एप्रिलमध्ये सुरू करण्याचा मानस असल्याचेही नवले यांनी सांगितले.