शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता ओलांडताना करावी लागतेय कसरत

By admin | Updated: August 27, 2016 01:34 IST

येथील चौकात रिक्षाचालक रस्त्यातच रिक्षा उभ्या करतात. चौकामध्ये कोंडीची समस्या उद्भवत आहे.

पिंपरी : येथील चौकात रिक्षाचालक रस्त्यातच रिक्षा उभ्या करतात. चौकामध्ये कोंडीची समस्या उद्भवत आहे. यामुळे पादचाऱ्यांनादेखील रस्ता ओलांडताना तारेवरची कसरत करावी लागत असून, अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. पिंपरी चौक परिसरात विविध शासकीय कार्यालये आहेत. दिवसभर नागरिकांची वर्दळ सुरू असते. चौकामधील कोंडीची समस्या कमी करण्यासाठी चारही दिशांचे रस्ते प्रशस्त आहेत. तसेच दिवसभर या चौकात वाहतूक पोलीस असतात. मात्र, रिक्षाचालक बेशिस्तपणे रस्त्यावरच रिक्षा उभ्या करतात. बँक आॅफ इंडियासमोर तर सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत पाच ते सात रिक्षावाले रस्त्यावर बेशिस्तरीत्या वाहने उभी करतात. जादा प्रवासी मिळण्यासाठी त्यांच्यात स्पर्धांच सुरू असते. यामुळे बँकेत येणाऱ्या ग्राहकांना बँकेत जाण्यासाठीदेखील रस्ता राहत नाही. दरम्यान, बँकेत येणाऱ्या ग्राहकांनादेखील पार्किंगची सुविधा नसल्याने रस्त्यावरच वाहने पार्किंग करत असल्यामुळे कोंडीची समस्या उद्भवत आहे. तसेच सिग्नल सुटल्यावर पाठीमागून वाहन धडकून अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. या चौकात विविध राजकीय पक्षांचेदेखील आंदोलन-उपोषण होत असतात. त्या वेळेस मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होऊन वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागतात. महापालिकेत येणारे नागरिक रस्त्यावरच वाहने पार्किंग करत असल्याने या कोंडीत अधिकच भर पडत आहे. यामुळे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणेही अवघड झाले आहे. चौकातील पोलीस मात्र या वाहनांवर कारवाई न करता दुचाकीधारकांना अडवून दंड वसुलीत व्यस्त असल्याचे पादचाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे रस्ता ओलांडताना अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न पादचाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. (वार्ताहर)>निगडी प्राधिकरण : मृत्यूचा सापळानिगडी : चौकातील कोंडी कमी करण्यासाठी प्रशस्त रस्ते करूनदेखील चौकातच बेशिस्तरीत्या वाहने उभे राहत असल्यामुळे टिळक चौकात अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणेही अवघड झाले आहे, असे असतानादेखील वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष झाले असल्याचे दिसून येत आहे. मुंबई-पुणे महामार्गावरील टिळक चौकात दिवसभर वाहनांची वर्दळ सुरू असल्याने पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणेही अवघड झाले आहे. या चौकातील कोंडी कमी करण्यासाठी उड्डाणपुलदेखील उभारण्यात आला असून, चौकातील चारही दिशांचे रस्तेदेखील प्रशस्त केले आहेत. मात्र, असे असतानादेखील या प्रशस्त रस्त्यांवर मोटारचालकांसह प्रवासी रिक्षा बेशिस्तपणे उभ्या राहत असल्यामुळे दररोज कोंडीची समस्या उद्भवत आहे.