शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
2
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
3
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
4
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
5
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
6
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
7
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
8
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
9
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
10
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
11
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
12
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
13
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
14
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
15
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
16
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
17
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
18
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
19
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
20
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."

सलग तिसऱ्या दिवशी कामकाज ठप्प

By admin | Updated: August 3, 2016 03:33 IST

सलग तिस-या दिवशी विधान परिषदेत शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादीने विधान परिषदेचे कामकाज रोखून धरले.

मुंबई : अखंड महाराष्ट्राच्या मुद्यावरून मंगळवारी सलग तिस-या दिवशी विधान परिषदेत शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादीने विधान परिषदेचे कामकाज रोखून धरले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन वेळा तेच निवेदन केले. या निवेदनाने आमचे समाधान झाले नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनीच अखंड महाराष्ट्राचा ठराव दोन्ही सभागृहात मांडावा, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली. सकाळी कामकाजाला सुरुवात होताच राष्ट्रवादीचे सदस्य सुनील तटकरे यांनी बोलायला सुरुवात केली. विरोधी बाकांवरून अखंड महाराष्ट्राच्या घोषणा सुुरुच राहिल्यामुळे सभापती रामराजे नाईक झ्रनिंबाळकर यांनी सभागृहाचे कामकाज पंधरा मिनिटांसाठी तहकूब केले. त्यानंतर कामकाज सुरु होताच तटकरे यांनी स्थगन प्रस्तावाची सूचना मांडली. राज्याच्या स्थापनेपासून विविध शक्तींनी महाराष्ट्र तोडण्याचे प्रयत्न केले. आता भाजपा सत्तेत आल्यापासून वेगळ्या विदर्भाची चर्चा सुरु आहे. शुक्रवारी भाजपा खासदाराने लोकसभेत अशासकीय ठरावाद्वारे वेगळ्या विदर्भाचा ठराव मांडला. हा अशासकीय ठराव मांडला तरी तो सत्ताधारी सदस्यांनी मंजूर केला तर तसा ठराव राज्याकडे येऊ शकतो, असे ते यावेळी म्हणाले. त्यामुळे अखंड महाराष्ट्राबाबत चर्चेला परवानगी देण्याची मागणी तटकरे यांनी केली. शेकापचे जयंत पाटील यांनी देखील अखंड महाराष्ट्रावरील चर्चेची मागणी केली. मात्र सभापतींनी ही सूचना फेटाळल्यामुळे विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातला. चर्चेच्या मागणीसाठी हा गोंधळ सुरूच राहिल्यामुळे चार वेळा सभागृह तहकूब करावे लागले. ठराव दोन्ही सभागृहात आणा अखंड महाराष्ट्राचा विषय मांडत असताना चार-चार मंत्री उभे राहून विरोध करत आहेत. ही बाब लाजिरवाणी आहे. जोपर्यंत दोन्ही सभागृहात अखंड महाराष्ट्राचा ठराव मुख्यमंत्री मांडत नाहीत तोपर्यंत आमचे समाधान होणार नाही, असा इशारा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिला. (प्रतिनिधी)>आता काय छाती फाडून सांगायचे का?एरव्ही शांत आणि संयमी असणारे सभागृह नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आज विरोधकांच्या अडवणुकीमुळे संतप्त झाले. वेगळ्या विदर्भाचा कोणताच प्रस्ताव नाही. मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी स्पष्टपणे खुलासा केला आहे. तरीही वारंवार हा विषय सभागृहात मांडून कामकाज रोखले जात आहे. त्यामुळे आता हनुमानासारखे छाती फाडून सांगायचे का, असा सवाल पाटील यांनी विरोधकांना उद्देशून केला. >मराठी जनतेचा हा चौथा लढा स्वातंत्र्यानंतर मराठी जनतेला तीन महत्वाचे लढे लढावे लागले. एक निजामाविरुद्ध, दुसरं पोतुर्गीजांविरुद्ध , तर तिसरा स्वतंत्र महाराष्ट्रासाठी लढावा लागला. आता सत्ताधारी भाजपाच्या भूमिकेमुळं अखंड महाराष्ट्रासाठी चौथा लढा लढावा लागण्याची वेळ आली आहे, असे कॉंग्रेसचे शरद रणपिसे म्हणाले.