शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

प्रचार साहित्य खरेदीसाठी कार्यकर्त्यांची धाव

By admin | Updated: February 9, 2017 16:08 IST

दुकाने गजबजली : माघारीनंतर खऱ्या र णधुमाळीला सुरुवात

नाशिक : महापालिका निवडणुकीच्या रणसंग्रामाला बुधवारपासून (दि.८) खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असून, उमेदवारांनी प्रभाग पिंजून काढण्यास प्रारंभ केला आहे. प्रचार करण्यासाठी विविध पक्षांच्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून निवडणूक प्रचार साहित्यविक्रीच्या दुकानांकडे धाव घेतली जात आहे.महापालिका निवडणुक ीच्या माघारीनंतर प्रचाराला उमदेवारांनी जोरदार सुरुवात केली आहे. बुधवारी सकाळपासूनच विविध पक्षांच्या उमेदवारांसह अपक्षांनीही प्रचारफेऱ्या काढण्यास सुरुवात केली. निवडणूक प्रचार साहित्याच्या किमती यंदा वाढल्या असून, शहरातील मेनरोड, अशोकस्तंभ, नाशिकरोड भागातील दुकानांवर गर्दी होऊ लागली आहे. माघारीनंतर अपक्ष उमेदवारांचीदेखील प्रचार साहित्य खरेदीसाठी वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.टोप्या, मफलर, निवडणूक चिन्ह, झेंडे, पताका, टी-शर्ट, स्टिकर खरेदीसाठी कार्यकर्त्यांची गर्दी होत असल्याचे चित्र आहे. एकूणच प्रचार साहित्य खरेदी-विक्रीच्या माध्यमातून मोठी आर्थिक उलाढाल होत आहे. सर्वप्रथम उमेदवारांकडून निवडणूक प्रचार साहित्यांच्या खरेदीला प्राधान्य दिले जात आहे. विशेष म्हणजे निवडणूक साहित्य विक्रीच्या दुकानांमध्ये कॉँग्रेस, भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी कॉँग्रेस, मनसे असे सर्वच पक्षांचे साहित्य एकत्र सुखाने नांदत असल्याचे चित्र आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीच्या तुलनेत यंदा सर्वच प्रचार साहित्य महागले आहे. विविध निवडणूक चिन्हांचे आगळे प्रकार उपलब्ध झाले आहेत. कागदापासून तर प्लॅस्टिक व मेटलमध्येदेखील बिल्ले, बॅच बाजारात आले आहेत. उमेदवारांची यादी जाहीर झाल्यापासून प्रचार साहित्य खरेदीसाठी कार्यकर्त्यांची पावले दुकानांकडे वळू लागली आहेत. छाननीनंतर मात्र खरेदीला वेग आला असून माघारीची मुदत संपल्यानंतर निवडणूक रिंगणातील सर्वच उमेदवारांनी प्रचार साहित्य खरेदीवर भर दिला आहे. झेंडे, टोप्या शेकड्यावर तर बॅचेस डझनावर विकले जात आहे.---प्रचार साहित्याचे दर...झेंडे २००० रुपये शेकडालहान झेंडे १२०० रुपये शेकडासाधी मफलर ८०० शेकडा रुपयेटोपी २००० रुपये शेकडाडेमो इव्हीएम यंत्र ४०० ते ५०० रुपये नगसॅटिन मफलर २००० शेकडा रुपयेप्लॅस्टिक बॅच ४०० रुपये शेकडामेटल बॅच १२०० रुपये शेकडा