शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेला प्रतीक्षा अंदाजपत्रकाची काम अपूर्ण : स्थायीकडून प्रत देण्यास टाळाटाळ

By admin | Updated: May 5, 2014 19:31 IST

नाशिक : नवे आर्थिक वर्ष सुरू होऊन महिनाभराचा कालावधी लोटला आहे; परंतु स्थायी समितीने अद्याप अंदाजपत्रकच तयार केलेले नाही. त्यामुळे नवीन निधीची तरतूद नसल्याने तूर्तास जुन्या तरतुदींवरच काम भागवावे लागत आहे.

नाशिक : नवे आर्थिक वर्ष सुरू होऊन महिनाभराचा कालावधी लोटला आहे; परंतु स्थायी समितीने अद्याप अंदाजपत्रकच तयार केलेले नाही. त्यामुळे नवीन निधीची तरतूद नसल्याने तूर्तास जुन्या तरतुदींवरच काम भागवावे लागत आहे.महापालिका प्रशासनाने जानेवारी महिन्यात अंदाजपत्रक सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात स्थायी समितीने अंदाजपत्रकाला आकार देऊन ते महासभेला पाठविले जाणे आवश्यक आहे. आणि मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत महासभेने अंदाजपत्रक मंजूर केले पाहिजे, जेणेकरून १ एप्रिल या आर्थिक वर्षाच्या प्रारंभापासून नव्या आर्थिक वर्षाचे धोरण राबविता येते. याशिवाय नवीन आर्थिक वर्षापासून कोणतीही करवाढ करायची असेल तर त्यासाठी त्याला २० मार्चच्या आत महासभेने संमती देणे आवश्यक असते. त्यानंतरच ती नव्या वर्षात लागू होते. परंतु गेल्या काही वर्षांपासून प्रशासनच वेळेत अंदाजपत्रक सादर करीत नाही. परिणामी स्थायी समिती एप्रिल महिन्याच्या आत कधीही अंदाजपत्रक सादर करीत नाही. अंतिम अंदाजपत्रक मंजुरीला जून-जुलै महिना उजाडतो आणि त्याची दुरुस्तीसह मंजूर प्रत बाहेर पडण्यास किमान ऑक्टोबर ते नोव्हेंबरपर्यंतचा कालावधी लागतो. यंदादेखील प्रशासनाने अंदाजपत्रक प्रचंड विलंबाने म्हणजेच फेबु्रवारीच्या मध्यावर सादर केले. त्यानंतर स्थायी समितीने एक बैठक घेतली आणि दरवाढ फेटाळतानाच अनेक निर्णय घेतले. परंतु अंदाजपत्रकाचे पुस्तकच अद्याप तयार केले नाही. स्थायी समितीचे सभापती रमेश धोंगडे यांचे अंदाजपत्रकात निवेदन प्रसिद्ध करायचे असून, ते काम पूर्ण झालेले नसताना अंदाजपत्रकाची प्रत लेखा विभागाकडे पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले. तथापि, स्थायी समितीकडून अशा प्रकारे कोणतेही अंदाजपत्रक लेखा विभागाला प्राप्त झाले नसल्याचे लेखा विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे आचारसंहितेचा बाऊ पुढे केला जात असला, तरी प्रत्यक्षात मात्र अंदाजपत्रकच तयार नसल्याचे स्पष्ट झाले आहे....इन्फो...अखेरच्या सभेत विक्रमी ठरावस्थायी समितीची अखेरची बैठक २८ फेब्रुवारी रोजी झाली. या बैठकीत जादा विषय नव्हतेच. परंतु नंतर एकेक ठराव घुसविण्याचे प्रकार सुरू झाले आणि ही संख्या वाढतच आहे. अखेरच्या बैठकीतील जादा विषयाचा शेवटचा क्रमांक देण्यासही नगरसचिव विभागाला शक्य होत नाही.