शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

हिंदूंना सबळ करण्यासाठी संघाचे कार्य - मोहन भागवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 06:01 IST

सर्व विश्वाला सर्व सुखी करणारा हिंदू समाज असून, या समाजाला सबळ कसे करायचे, या समाजातील माणसामागे शक्ती कशी उभी करायची

मलकापूर (बुलडाणा) : सर्व विश्वाला सर्व सुखी करणारा हिंदू समाज असून, या समाजाला सबळ कसे करायचे, या समाजातील माणसामागे शक्ती कशी उभी करायची, हे कार्य संघ करीत असून, हे संघाचे कार्य अनेकांची तपश्चर्या व तपस्येतून उभे राहिले आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.भारतीय नागरिक उत्थान समिती मलकापूरद्वारा निर्मित पू. बाळासाहेब देवरस स्मृती भवनाचे लोकार्पण गुरुवारी भागवत यांच्या हस्ते झाले. या वास्तूत उद्ययावत अभ्यासिका व संगणक उपलब्ध आहे. यानिमित्त भागवत यांच्या जाहीर उद्बोधनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.भागवत म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे शिस्त अन् अनुशासन यांचा मेळ आहे. स्वयंसेवक म्हणजे शुद्ध व सात्विक आत्मीयता. सर संघ कार्यालय म्हणजे आत्मीयता व सूचीतेचा अनुभव देणारे कार्यालय, असा अनुभव प्रत्येकाला येतो. संघ कार्यालय हे केवळ स्वयंसेवकांचे न राहता ते संपूर्ण समाजाचे व्हावे, समाजाच्या निरपेक्ष सेवेचे केंद्र व्हावे, देशभक्तीच्या विचारांचे प्रेरणास्रोत व्हावे.स्वयंसेवकांनी स्वत:चे वैयक्तिक जीवन उन्नत करावे, स्वत:च्या कुटुंबासाठी आवश्यक भौतिक सुविधांसाठी परिश्रम करावेत त्यासाठी लागणारी बुद्धिमत्ता, कौशल्यप्राप्त करावे; परंतु त्याच वेळी ज्या समाजामुळे आपण सुखनैव जगतो त्या समाजाचा मात्र विसर पडू देऊ नये. समाज सुखी, संपन्न, शक्तिशाली व सुस्थिर असेल तरच आपल्याला जीवन आनंदाने जगता येईल, असेही सरसंघचालक भागवत म्हणाले.भागवत यांच्या वक्तव्याने चर्चेला पुन्हा उधाळ आले आहे़