शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडी पालिकेत तब्बल ८३९ पदे रिक्त; स्वच्छता कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 19:16 IST

भिवंडी महानगरपालिका प्रशासनात वर्ग एक ते वर्ग चार दरम्यान तब्बल ८३९ पदे रिक्त असल्याची बाब समोर आली आहे.

नितिन पंडीत

भिवंडी: भिवंडी महानगरपालिका प्रशासनात वर्ग एक ते वर्ग चार दरम्यान तब्बल ८३९ पदे रिक्त असल्याची बाब समोर आली आहे. अनेक वर्षांपासून मनपा प्रशासनात भरती प्रक्रिया न झाल्याने वर्ग तीन व चारच्या कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर प्रभारी अधिकारी पदाची नियुक्ती देऊन प्रशासनाचा कारभार हकावा लागत आहे. विशेष म्हणजे अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादाने वर्ग चार मध्ये मोडणारे व सफाई कामगार म्हणून नियुक्ती असलेले शेकडो सफाई कर्मचारी आज प्रभारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत . मात्र या सफाई कामगारांची वर्णी प्रभारी अधिकारी म्हणून केली असल्याने शहर स्वच्छतेची जबाबदारी असलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला असून शहर स्वच्छतेबाबत याच सफाई कामगारांना दोषी ठरविले जात असतांना भ्रष्ट मार्गाने पदे बळकाविणाऱ्या प्रभारी अधिकाऱ्यांकडे मनपा आयुक्त नेमकी काय कारवाई करणार हे पाहणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे अनेक विभागांसह प्रभागातील अधिकारी पदावर वर्षोनुवर्षे प्रभारी नेमून करून प्रशासनाचा गाडा हाकला जात असल्याने प्रशासकीय कामाचा पुरता खेळखंडोबा झाला आहे .

भिवंडी पालिका क्षेत्रात ४३६२ पदे मंजूर असून त्यामध्ये वर्ग एकची ३२ तर वर्ग दोनची ५० पदे मंजूर असून त्यापैकी वर्ग एकची १० व वर्ग दोन मध्ये ९ अशी १९ पदे भरली असून तब्बल ६३ पदे रिक्त आहेत. ज्यामध्ये विभाग प्रमुख कार्यालय अधीक्षक यांसह प्रमुख पदांचा समावेश होत असून या पदावर मागील कित्येक वर्षे भरती प्रक्रिया न झाल्याने या पदांवर वर्ग तीन व वर्ग चार मधील शैक्षणिक पात्रता असलेल्या कामगार वर्गातील व्यक्तींकडे या पदांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे . तर वर्ग तीन या लिपिक संवर्ग पदावरील तब्बल ५१४  पदे रिक्त असल्याने या पदांवरती स्वच्छता कामगारांची वर्णी लावण्यात आली आहे.

यामुळे ज्या मूळ वर्ग चारच्या स्वच्छता कामगार पदावरील मंजूर २४७० पदांपैकी २३८२ पदे भरली गेली आहेत परंतु स्वच्छता विभागात आजच्या क्षणी अवघे ११५० कामगार काम करीत असून उर्वरित कामगारांपैकी सुमारे ६०० कामगार हे कार्यालयीन कामावर आहेत. तर सुमारे ३५० हुन अधिक कामगार मयत अथवा इजा निवृत्ती घेऊन बसले आहेत . या जागा अजून ही भरल्या नसल्याने शहराच्या स्वच्छतेचे काम प्रशासन ११५० कामगारां कडून करून घेत असल्याने शहराच्या स्वच्छतेचा बोजवारा उडाला असून शहराची ओळख बकाल व अस्वच्छ शहर म्हणून केली जात आहे . 

स्वछता कर्मचारी म्हणून नियुक्ती असलेले शेकडो कामगार हे वर्ग २ व वर्ग ३ पदावर काम करीत असल्याने त्यांच्या चुकीच्या कामाची जबाबदारी घेणार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे . परंतु अनुकंपा अथवा वारस हक्काने स्वच्छता कामगार म्हणून दाखल होत प्रत्येक जण आपल्या महापालिकेतील गॉड फादर कडून टेबल खुर्ची वरील जागा पटकावत असल्याने मूळ स्वच्छतेच्या कामासाठी कामगारांची नेहमीच वानवा भासत आहे. या सर्व प्रकाराचा ताण मनपाच्या सफाई कर्मचाऱ्यांवर पडत असल्याने मनपा आयुक्त या बाबीकडे लक्ष देणार का असा सवाल उपस्थित झाला आहे. 

मंजूर पदाचा तक्ता 

वर्ग    -  मंजूर    -   भरलेली  -   रिक्त 

वर्ग १ -  ३२      -    १०       -   २२

वर्ग २ -  ५०      -    ०९       -   ४१

वर्ग ३ -  ११०९  -    ५९५     -  ५१४

वर्ग ४ -  ३१७१  -    २९०९   -  २६२

-----------------------------------------------

एकूण - ४३६२   -   ३५२३   -   ८३९

टॅग्स :Bhiwandiभिवंडी