शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
3
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
4
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
5
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
6
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
7
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
8
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
9
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
10
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
11
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
12
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
13
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
14
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
15
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
16
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
17
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
18
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
19
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
20
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे

जळगाव महापालिकेत काम बंद आंदोलन

By admin | Updated: January 2, 2017 20:12 IST

शिवीगाळ केल्याने सोमवारी सकाळी १०.३० वाजता महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोेलन करत थेट शहर पोलीस स्टेशन गाठले

ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 2 - लोकशाही दिनी तक्रार दाखल करण्यास आलेल्या जागृत जनमंचचे शिवराम पाटील व अनिल नाटेकर यांनी उपायुक्त लक्ष्मीकांत कहार यांच्याशी अरेरावी करत त्यांच्यावर विविध आरोप करून शिवीगाळ केल्याने सोमवारी सकाळी १०.३० वाजता महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोेलन करत थेट शहर पोलीस स्टेशन गाठले. मनपाचे अधिकारी, कर्मचारी पोलीस स्टेशनला बराच वेळ ठाण मांडून होते. दोघांना तात्काळ अटक करा, अशी आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांची मागणी होती. दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी महापालिकेत लोकशाही दिनाचे आयोजन केले जात असते. त्यानुसार सकाळी १०.३० वाजता महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात आयुक्त जीवन सोनवणे, उपायुक्त लक्ष्मीकांत कहार यांच्यासह अन्य विभाग प्रमुख लोकशाही दिनाचे अर्ज स्वीकारत होते. हे कामकाज सुरू असताना ११.१५ वाजेच्या सुमारास या ठिकाणी जिल्हा जागृत जनमंचचे पदाधिकारी शिवराम पाटील व अनिल नाटेकर हे दोघे आले. लोकशाही दिनात नियमानुसार १५ दिवस अगोदर तक्रार अर्ज देणे बंधनकारक आहे. तक्रार वैयक्तिक स्वरूपाची असावी असे प्रवेशद्वाराजवळ कर्मचारी सांगत असताना शिवराम पाटील व नाटकेर यांनी चिडून आरोपांना सुरुवात केली. जोरजोराने वाद सुरू असल्याचे लक्षात आल्याने उपायुक्त लक्ष्मीकांत कहार व अन्य काही अधिकारी सभागृहाच्या प्रवेशद्वाराजवळ गेले. अधिकारी आल्याचे पाहून पाटील व नाटेकर यांनी त्यांच्याशी अरेरावीची भाषा सुरू केली. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून शिवराळ भाषेत हुज्जत घालण्यास सुरूवात गेली. जोरजोराने हे दोघे बोलत असल्याने या ठिकाणी गर्दी झाली होती. कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलनशहर पोलीस स्टेशन आवारात महापालिकेतील सर्व कर्मचारी, महिला कर्मचारी एकत्र आले होते. शिवराम पाटील व अनिल नाटेकर यांना अटक केल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही, अशी या कर्मचाऱ्यांची भूमिका होती. अखेर उपायुक्त लक्ष्मीकांत कहार यांच्या तक्रारीवरून दुपारी ४ वाजेच्या सुमारास शिवराम पाटील व नाटेकर यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला.