शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हारे गावातील मोऱ्यांचे सुरू असलेले काम निकृष्ट

By admin | Updated: June 29, 2016 02:45 IST

तालुक्यातील कोल्हारे गावात सांडपाणी वाहून नेणाऱ्या गटारामध्ये सिमेंट मोऱ्या टाकण्याचे काम सुरू आहे.

कर्जत : तालुक्यातील कोल्हारे गावात सांडपाणी वाहून नेणाऱ्या गटारामध्ये सिमेंट मोऱ्या टाकण्याचे काम सुरू आहे. गावातील सांडपाणी नाल्यात जाण्यासाठी जुन्या गटारामध्ये मोऱ्या टाकण्याचे सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्र ार ग्रामस्थांनी कर्जत पंचायत समितीकडे केली आहे.कोल्हारे गावात जुन्या गटारामध्ये सिमेंट मोऱ्या टाकून सांडपाणी थेट नाल्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न ग्रामपंचायतीने सुरू केला आहे. हे काम करताना जुन्या असलेल्या मोडक्या तोडक्या गटाराची प्रथम दुरु स्ती होणे आवश्यक आहे. मात्र जुन्या गटाराची दुरु स्ती न करता त्या सांडपाणी वाहून नेणाऱ्या कोल्हारे ग्रामपंचायतीसमोरील या गटारात सिमेंट पाइप टाकून गटार बंदिस्त करण्याचे काम सुरू केले आहे. मात्र सुरू असलेले गटाराचे बंदिस्त काम करताना आजूबाजूला सिमेंटने आधी गटार बांधणे आवश्यक असताना त्या स्थितीत पाइप टाकले जात आहेत. दुसरीकडे आजूबाजूची माती गटारात टाकून पाइप टाकण्यात येत असल्याचा आरोप कोल्हारे गावातील ग्रामस्थ विजय हजारे यांनी कर्जत पंचायत समितीला दिलेल्या तक्र ारीत केला आहे.विजय हजारे यांनी कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी म्हात्रे यांना तक्र ारीचे निवेदन देताना कोल्हारे गावात बांधलेले गटार फोडून काढल्यास निकृष्ट काम कसे असते हे दिसून येईल. त्यासाठी कर्जत पंचायत समितीने चौकशी करून संबंधित काम पुढे सुरू ठेवण्याची मागणी केली आहे.>काम सुरु असताना अधिकारी नव्हते उपस्थितकाम सुरू असताना कर्जत पंचायत समितीचा कोणताही अधिकारी तेथे उपस्थित नसल्याने असे निकृष्ट काम झाले असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे गटाराचे झालेले काम कर्जत पंचायत समिती फोडून पाहणार की झालेल्या कामाचे बिल अदा करते, याकडे कोल्हारे ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.