शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

‘काशिनाथ घाणेकर’च्या दुरुस्तीचे काम रखडले

By admin | Updated: July 19, 2016 03:12 IST

डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहातील प्लास्टर आॅफ पॅरिसचे छत कोसळल्याची घटना घडून आता जवळजवळ अडीच महिन्यांचा काळ लोटला

ठाणे : डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहातील प्लास्टर आॅफ पॅरिसचे छत कोसळल्याची घटना घडून आता जवळजवळ अडीच महिन्यांचा काळ लोटला तरीसुद्धा अद्यापही त्याच्या दुरुस्तीस सुरुवात झालेली नसल्याचे समोर आले आहे. यामुळे नाट्यप्रेमींची घोर निराशा तर झाली आहेच, शिवाय पालिकेलाही या कालावधीत ४० लाखांचा फटका बसला आहे. विशेष म्हणजे या कामाच्या निविदा अंतिम झाल्या असल्या तरी त्या अद्याप उघडल्या नसल्याचे उघड झाले आहे. २५ एप्रिलला रात्री १२.१० च्या सुमारास ही घटना घडली होती. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी पालिकेच्या भोंगळ कारभाराचा पर्दाफाश मात्र झाला होता. पालिकेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळेच ही घटना घडल्याचे अहवालातही उघड झाले आहे. दरम्यान, एक महिन्यात या नाट्यगृहाची दुरुस्ती करून ते नाट्यप्रेमींच्या सेवेत हजर होईल, अशी ग्वाही पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली होती. त्यानुसार, सुरुवातीला त्याच्या दुरुस्तीचे काम पुन्हा त्याच ठेकेदाराकडून करून घेण्याचा अट्टहास पालिकेने केला होता. मात्र, त्याने नकार दिल्याने अखेर पालिकेनेच या नाट्यगृहाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले. गेल्या महिन्याच्या अखेरीस पालिकेने या कामाचा प्रस्ताव तयार केला असून त्यासाठी २४ लाख ८३ हजारांचा खर्च होणार आहे. निविदा अंतिम झाल्या असल्या तरी त्या उघडलेल्या नाहीत. त्या उघडल्यानंतर त्यासंदर्भातील प्रस्ताव तयार करून तो आयुक्तांच्या मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे. मंजुरीनंतर स्थायीच्या मंजुरीसाठी तो ठेवला जाणार आहे. यासाठी जुलै महिना संपणार आहे. त्यानंतर, प्रत्यक्षात कामाला पुढील महिन्यात सुरुवात होणार असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. परंतु, हे काम सुरू झाल्यानंतरही आणखी दोन महिन्यांचा कालावधी या कामासाठी जाणार असल्याने साधारणत: दिवाळीपूर्वी नाट्यगृह नाट्यप्रेमींसाठी खुले होईल, असा आशावाद पालिकेने व्यक्त केला आहे. पालिकेला या नाट्यगृहापासून महिनाकाठी सुमारे १३ लाखांचे उत्पन्न मिळत आहे. गडकरी रंगायतनपेक्षा याचे उत्पन्न अधिक आहे. असे असूनही या कामाच्या दिरंगाईवरून पालिकेला आतापर्यंत ४० लाखांचा फटका बसला असून पुढील दोन महिन्यांत आणखी २६ लाखांच्या उत्पन्नाला मुकावे लागण्याची चिन्हे आहेत.