शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो-३च्या कामाने केली झोपमोड, नुकसान भरपाईसाठी न्यायालयात धाव  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 06:47 IST

सिप्झ ते कुलाबा या मेट्रो-३ प्रकल्पाचे काम रात्रंदिवस सुरू आहे. मात्र, यामुळे या परिसरातील नागरिकांची झोपमोड होत आहे. या झोपमोडीसाठी नुकसानभरपाई मिळावी, यासाठी एका नागरिकाने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

मुंबई : सिप्झ ते कुलाबा या मेट्रो-३ प्रकल्पाचे काम रात्रंदिवस सुरू आहे. मात्र, यामुळे या परिसरातील नागरिकांची झोपमोड होत आहे. या झोपमोडीसाठी नुकसानभरपाई मिळावी, यासाठी एका नागरिकाने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दोन मुली व पत्नीची झोपमोड होत असल्याने, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. (एमएमआरसीएल)ने दरदिवशी प्रत्येकी दहा हजार रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी कुलाब्याच्या एका रहिवाशाने उच्च न्यायालयात याचिकेद्वारे केली आहे.मेट्रो-३ प्रकल्पाचे काम करताना, ध्वनिप्रदूषणाच्या नियमांना धाब्यावर बसवले जात आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार रात्रीच्या वेळी आवाजाची पातळी ४५ डेसिबल असणे, तसेच बांधकाम करायचे असल्यास संबंधित मशिन्सना सायलेन्सर बसवणे बंधनकारक आहे. मात्र, एमएमआरसीएल या नियमांचे उल्लंघन करत आहे. विशेषत: रात्रीच्या वेळी आवाजाची पातळी मर्यादेबाहेर असते. त्यामुळे माझ्या दोन मुलींची व पत्नीची झोपमोड होत आहे. एमएमआरसीएलला माझ्या मुलींना व पत्नीला १ फेब्रुवारी २०१७पासून दरदिवशी १० हजार रुपयेप्रमाणे नुकसानभरपाई देण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी कुलाब्याचे रहिवासी रॉबिन जयसिंघानी यांनी उच्च न्यायालयात याचिकेद्वारे केली आहे. न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी ११ आॅगस्ट रोजी ठेवली आहे.तसेच याचिकाकर्त्याने ही याचिका प्रलंबित असेपर्यंत कामकाजाला स्थगिती देण्याची विनंतीही केली आहे. ‘एमएमआरसीएला ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे पालन करण्याचा व रात्रीचे काम बंद करण्याचा आदेश द्यावा,’ अशीही मागणी याचिकेत केली आहे.