शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

भिवंडीत सफाई कामगारांचा संप

By admin | Updated: November 2, 2016 03:39 IST

ऐन दिवाळीत शहरातील कचरा कंत्राटदारांनी उचलला नाही. तर पालिका कामगारांनी आंदोलन पुकारत नागरिकांना वेठीस धरले आहे

भिवंडी : ऐन दिवाळीत शहरातील कचरा कंत्राटदारांनी उचलला नाही. तर पालिका कामगारांनी आंदोलन पुकारत नागरिकांना वेठीस धरले आहे. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी कचरा साचल्याने दुर्गंधी पसरली आहे. या प्रकरणी आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.दिवाळीसाठी आॅक्टोबरचा पगार लवकर मिळावा तसेच दरवर्षीप्रमाणे सानुग्रह अनुदान मिळावे अशी महापालिकेतील सर्व कर्मचारी संघटनेची मागणी होती. परंतु काही नगरसेवकांनी महासभेत कर्मचारी काम करीत नाही,असा आरोप करीत कामगारांना दुषणे दिली. त्यामुळे कामगारांनी आंदोलन पुकारले. महापालिकेची आर्थिक स्थिती संकटात असल्याने कामगारांच्या मागण्या पूर्ण करता येणार नाही, असा पवित्रा आयुक्तांनी घेतल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. महापौर तुषार चौधरी यांनी ९५०० रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचे सांगत कामगारांची सहानभूती मिळविली. परंतु ते आपला शब्द पूर्ण करू न शकल्याने आपली फसवणूक झाल्याची भावना कामगारांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)>नागरिक दुर्गंधीने त्रस्तया सर्व घटनांमुळे कामगारांनी सोमवारपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. सफाई कामगारांचा संप तसेच कंत्राटदारांनी दोन दिवसांपासून कंत्राटदारांनी कचरा कुंडीतून उचलला नसल्याने तो रस्त्यावर आला आहे. तसेच कुजलेल्या कचऱ्याची दुर्गंधी पसरली आहे.