शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘व्हॉट्सअ‍ॅप’वर चालणार उदंचन केंद्रांचे काम

By admin | Updated: July 1, 2017 03:16 IST

उदंचन केंद्रांच्या कार्यवाहीचे समन्वयन व संनियंत्रण करणे सुलभ होण्यासह अधिकाऱ्यांना परस्पर संपर्क साधणे सुकर व्हावे,

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : उदंचन केंद्रांच्या कार्यवाहीचे समन्वयन व संनियंत्रण करणे सुलभ होण्यासह अधिकाऱ्यांना परस्पर संपर्क साधणे सुकर व्हावे, यासाठी ‘व्हॉटसअ‍ॅप’ ग्रुप सुरू करण्यात आला आहे. या ग्रुपचे सकारात्मक परिणाम दिसू लागले असून, यामुळे पंप योग्यवेळी सुरू होण्यासोबतच पंप सुरू ठेवण्यासाठी आवश्यक डिझेलसाठाही वेळोवेळी उपलब्ध होणार आहे.मुंबई महापालिकेच्या पर्जन्यजल वाहिन्या या खात्याचे संबंधित उपप्रमुख अभियंता पी. पी. खेडकर यांनी यासंदर्भात सांगितले की, समुद्र किनाऱ्यालगत असणाऱ्या मुंबईची भौगोलिक रचना लक्षात घेता पावसाळ्यादरम्यान भरतीच्या कालावधीत पावसाचा वेग अधिक असल्यास सखल भागांमध्ये पाणी साचू शकते. या साचलेल्या पाण्याचा निचरा व्हावा, यासाठी महापालिका क्षेत्रात ६ ठिकाणी उदंचन केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. या उदंचन केंद्रांची एकत्रित पाणीउपसा क्षमता ही दर सेकंदाला तब्बल २ लाख ३४ हजार लीटर आहे.पंपिंग स्टेशन संबंधित प्रभावी समन्वयन व संनियंत्रण करता यावे यासाठी संबंधित परिमंडळांचे ४ उपायुक्त, संबंधित ८ विभागांचे सहायक आयुक्त, प्रमुख अभियंता (पर्जन्यजल वाहिन्या), उपप्रमुख अभियंता, पंपिंग स्टेशनशी संबंधित २ कार्यकारी व ४ सहायक अभियंते यांच्यासह पंपिंग स्टेशनशी संबंधित कंत्राटदारांचे वरिष्ठ तांत्रिक प्रतिनिधी यांच्यासाठी स्वतंत्र व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप सुरू करण्यात आला आहे.सर्व ६ पंपिंग स्टेशनच्या संबंधित अधिकाऱ्यांना त्यांच्या पंपिंग स्टेशनशी संबंधित आवश्यक ती सर्व माहिती नियमितपणे या ग्रुपवर टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत.