मुंबई : रायगड जिल्ह्णातील बाळगंगा धरणाचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. मात्र, कामाची रक्कम वाढविण्याच्या मागणीसाठी कंत्राटदाराने न्यायालयात धाव घेतल्याने वर्षभरापासून धरणाचे काम बंद आहे.याबाबत मुख्य सचिवांचा अहवाल तयार असून तो अहवाल न्यायालयात मांडला जाईल. आवश्यकता भासल्यास महाधिवक्त्यांना शासनाची बाजू मांडण्यास सांगण्यात येईल, असे नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
रायगड जिल्ह्यातील बाळगंगा धरणाचे काम बंद
By admin | Updated: April 8, 2015 01:09 IST