शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

स्त्री अधीक्षिकांविना आश्रमशाळांचे कामकाज

By admin | Updated: November 9, 2016 05:45 IST

बुलडाणा जिल्ह्यातील पाळा आश्रमशाळेतील अत्याचाराचे प्रकरण गाजत असतानाच राज्यातील १८५४पैकी तब्बल ११२६ आश्रमशाळांमध्ये स्त्री अधीक्षिकाच

विलास गावंडे, यवतमाळबुलडाणा जिल्ह्यातील पाळा आश्रमशाळेतील अत्याचाराचे प्रकरण गाजत असतानाच राज्यातील १८५४पैकी तब्बल ११२६ आश्रमशाळांमध्ये स्त्री अधीक्षिकाच नसल्याची बाब उजेडात आली आहे. त्यामुळे स्त्री अधीक्षिकांअभावी चालणाऱ्या या आश्रमशाळांमधील विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. वंचित घटकांना शिक्षण घेता यावे यासाठी १९५३-५४पासून राज्यात आश्रमशाळा सुरू करण्यात आल्या. आदिवासी विकास विभागांतर्गत ४५६ अनुदानित आश्रमशाळा आहेत. यातील केवळ २५२ ठिकाणी स्त्री अधीक्षिकांची नियुक्ती केली आहे. याच विभागाच्या ५२९ शासकीय आश्रमशाळा आहेत. त्यातील केवळ २९८ ठिकाणी स्त्री अधीक्षिका आहेत. सामाजिक न्याय विभागाच्या आश्रमशाळांची स्थिती यापेक्षा गंभीर आहे. या विभागाच्या ५२९ प्राथमिक, १९६ माध्यमिक आणि १४८ कनिष्ठ महाविद्यालय आश्रमशाळा आहेत. एकूण ८७३पैकी केवळ १८२ ठिकाणी स्त्री अधीक्षिका कार्यरत आहेत. काही काळ थांबलेली पदभरती आणि पुढे विविध कारणांमुळे या जागा रिक्त राहिल्या. २०१४पासून स्त्री अधीक्षिका पदाची नियुक्ती आवश्यक केली. बीएसडब्ल्यू आणि एमएसडब्ल्यूने महिला उमेदवाराची नियुक्ती करण्याचे आदेश दिले; तरीही या जागा अद्याप भरल्या नाहीत.