शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

कोपर्डीच्या आरोपींवर महिलांची चप्पलफेक

By admin | Updated: July 26, 2016 05:42 IST

कोपर्डीतील अत्याचार प्रकरणातील आरोपी संतोष भवाळ व नितीन भैलुमे यांच्यावर सोमवारी जिल्हा न्यायालयात संतप्त महिलांनी चप्पलफेक करत मारहाण केली. धक्काबुक्कीत महिला

अहमदनगर : कोपर्डीतील अत्याचार प्रकरणातील आरोपी संतोष भवाळ व नितीन भैलुमे यांच्यावर सोमवारी जिल्हा न्यायालयात संतप्त महिलांनी चप्पलफेक करत मारहाण केली. धक्काबुक्कीत महिला पोलीस जखमी झाल्या. पोलिसांनी पाच महिलांना ताब्यात घेत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़ न्यायालयीन सुनावणीनंतर आरोपींना नेत असताना शिवसेनेच्या माजी पदाधिकारी स्मिता अष्टेकर यांच्यासह पाच ते सहा महिलांनी आरोपींच्या दिशेने चप्पल भिरकावली. आरोपींना मारहाण करत त्यांना वाहनाबाहेर ओढण्याचा प्रयत्न केला़ न्यायालयाने आरोपींच्या कोठडीत ३० जुलैपर्यंत वाढ केली आहे़ दरम्यान, लोकांमध्ये कायद्याचा धाक राहिलेला नाही. त्यामुळे अत्याचार करणाऱ्यांचे जागेवरच हातपाय छाटले पाहिजेत, अशी संतप्त भावना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. ठाकरे यांनी कोपर्डीला भेट देऊन पीडित कुटुंबाचे सांत्वन केले. अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होत असल्याचे काही ग्रामस्थांनी त्यांना सांगितले. त्यावर कायद्याचा गैरवापर होत असल्यास त्याला सरकारने पर्याय शोधला पाहिजे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)पौडवालही संतापल्या- बलात्काऱ्यांना ते दिसतील तेथेच फोडून काढा, अशी संतप्त भावना ज्येष्ठ पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली. - कोपर्डीतील मुलींसाठी भैय्यूजी महाराज यांच्या इंदूर येथील श्री सद्गुरू दत्त धार्मिक एवं पारमार्थिक ट्रस्टतर्फे सूर्योदय कुहू कन्याधन सुरक्षा योजनेअंतर्गत चार स्कूलबस सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. - कोपर्डी व बीड जिल्ह्यात प्रत्येकी दोन बस सुरु होतील. मुलींच्या समुपदेशनासाठी ११ सदस्यांची समिती स्थापन करण्यात येणार आहे. त्याचे अध्यक्षपद पीडित मुलीच्या आईला देण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.